ETV Bharat / state

TISS Vice President : ॲपग्रस्त नाही, वंचितांसाठी लढणारी व्हायचंय, टिसच्या उपाध्यक्ष निदा परविन यांचा विश्वास

author img

By

Published : Oct 24, 2022, 8:59 PM IST

Updated : Oct 24, 2022, 10:59 PM IST

केवळ बुली बाई अँप प्रकरणातील बळी ( Bully Bai Aap Case ) ही ओळख नको आहे. तर मला टिसच्या कॅम्पसमध्ये लोकशाही समानतेची मूल्य रुजवायची आहेत. दलित, मुस्लिम समाजातील मुलींच्या प्रश्नांसाठी लढायचे आहे असा, विश्वास निदा परविन ( TISS vice-president Nida Parveen ) यांनी व्यक्त केला. टिसच्या ( TISS ) विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.

TISS vice-president
TISS vice-president

मुंबई - मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या ( Tata Institute of Social Sciences ) पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवडणूक नुकतीच पार ( Tata Institute of Social Science Students Election ) पडली. या निवडणुकीत निदा परवीन या बावीस वर्षीय विद्यार्थिनीने उपाध्यक्ष म्हणून विजय संपादन केला आहे.

निदा परविन

कोण आहे निदा परवीन? दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेली निदा परवीन सध्या मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत पदव्यूतर पदवीचे शिक्षण घेत आहे. लोकशाहीसाठी, समतेच्या मूल्यांसाठी लढणाऱ्या चळवळीत ती सहभागी होती. वादग्रस्त अशा शाहीन बाग आंदोलनातही ( Shaheen Bagh Movement ) तिचा सहभाग होता. याच कारणामुळे बुली बाई ॲप सारख्या खुल्या प्लॅटफॉर्मवरून महिलांच्या लावल्या जाणाऱ्या लिलावाच्या बोलीत तिच्याही नावाचा समावेश करण्यात आला होता. लिलावासाठी अपलोड करण्यात आलेल्या शंभर महिलांच्या प्रोफाइल प्रमाणे तिचेही प्रोफाइल या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली होती. निदा परवीन बुल्ली बाई अँपग्रस्त आहे. दिल्लीतून मुंबईला येतानाही तिच्या मनात मुंबई विषयी धाकधूक होती. कारण बुलीबाई प्रकरणातील काही आरोपी हे मुंबईशी संबंधित होते.

विद्यार्थी संघटना निवडणुकीत सहभाग - बुल्ली बाई प्रकरणातील बळी एवढीच आपली ओळख राहू नये. समतेच्या लढ्यासाठी लोकशाहीसाठी आपले योगदान असावे म्हणून वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया ( Welfare Party of India ) या संघटनेच्या वतीने ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत आपण जातीचे कार्ड वापरण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढणं हेच आपलं या निवडणुकीच्या माध्यमातून ध्येय होतं असं सांगणाऱ्या निदा परवीन या निवडणुकीत बाजी मारली आहे.

दलित, मुस्लिमांच्या हक्कासाठी लढणार - आपली ओळख केवळ एक बळी म्हणून असं आपल्याला योग्य वाटत नाही. तर, दलित, मुस्लिम महिलांना अद्याप अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. त्यांना संघर्ष करावा लागू नये समतेच्या आणि लोकशाहींच्या मूल्याची जपणूक व्हावी सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असून त्यासोबत विद्यार्थ्यांचे प्रश्नही सोडवणार असल्याचं परविन सांगते. विद्यार्थिनींच्या वस्तीगृहाचा प्रश्न निर्माण झाला असून दलित, मुस्लिम विद्यार्थिनींना वस्तीगृहात प्रवेश मिळत नाही. त्यांना विद्यापीठात बाहेर घरे भाड्याने घेऊन राहावं लागतं जे परवडणार नाही, सुरक्षितही नाही. त्यामुळे विद्यार्थिनींच्या या प्रश्नासाठीही आपण पाठपुरावा करणार असल्याचं निदा हिने सांगितलं.

Last Updated : Oct 24, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.