बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचारबंदी, EC कडून देशात पहिल्यांदाच कलम ३२४ चा वापर
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचार बंदी करण्यात आली आहे. मंगळवारी कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलामध्ये हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. भारतात बहुदा पहिल्यांदाच ३२४ या कलमाचा वापर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर -
ईश्वरचंद्र विद्यासागरांचा पुतळा तोडल्याबाबत मोदींनी साधा खेदही व्यक्त केला नाही - ममता बॅनर्जी
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शाह यांच्या रॅलीत झालेल्या गोंधळात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्यात आला. मात्र, मोदी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही की खेद व्यक्त केला नसल्याचे ममता म्हणाल्या. वाचा सविस्तर
देवेन भारती नवे एटीएस प्रमुख.. राज्यातील १९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई - राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकांना लक्षात घेऊन राज्यातील 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये 'कही खुशी कही गम' सारखे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई पोलीस खात्यात गेल्या 7 वर्षाहून अधिक काळ तळ ठोकून बसलेल्या आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पुन्हा लॉटरी लागली असून त्यांच्याकडे एटीएस प्रमुख पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. वाचा सविस्तर
महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई - राज्यातील तीव्र दुष्काळ पाहता, सर्वांचे लक्ष मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल याकडे लागले आहे. परंतु निर्माण झालेल्या स्थिती यामुळे मान्सून उशिरा दाखल होणार आहे. मान्सून ६ जूनला केरळात दाखल होत असून, यानंतर काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर
पत्नीच्या दोन प्रियकरांकडून पतीची निर्घृण हत्या; आरोपी गजाआड
पुणे - अनैतिक संबंधातील वादातून एका विवाहित तरुणाची पत्नीच्या दोन प्रियकरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील खंडाळे येथे घडली. गणेश पाडेकर (रा.आळेफाटा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वाचा सविस्तर