ETV Bharat / state

डोंगरी दुर्घटना : दुसऱ्या दिवशीही ढिगारा उपसण्याचे काम सुरूच... - dongri

डोंगरी येथील इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली तब्बल ५० जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफची टिम आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे

इमारत
author img

By

Published : Jul 17, 2019, 10:20 AM IST

मुंबई - डोंगरी येथील इमारत कोसळून अनेकजण त्यात मृत झाले तर काही जखमी झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या दिवशीही ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या रिपरिप पावसामुळे बचाव कार्यात काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या. मात्र, आता पावसाने उघड दिल्याने बचाव कार्याला वेग आला आहे. तर, अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू

मालाड येथील भिंत कोसळून अनेक जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी साडे अकराच्या सुमारास मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली तब्बल ५० जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफची टिम आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाले. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेत २२ तासानंतर आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात लहान मुलांचाही समावेश आहे.

डोंगरी येथील तांडेल क्रॉस लेनमधील दुर्घटनाग्रस्त ‘२५ बी, केसरभाई’ इमारतीची जबाबदारी नेमकी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यानंतर संबंधित ट्रस्टने २५ सी आणि २५ बी केसरभाई इमारतीची संरचनात्मक तपासणी करून घेतली. या तपासणीत इमारत अतिधोकादायक असल्याचे उजेडात आल्यामुळे म्हाडाने ही इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली. मात्र, आता कोसळलेल्या इमारतीच्या भागाची जबाबदारी म्हाडाने झटकली आहे. असे असले तरी, म्हाडाच्या एकमजली बांधकामावर अनधिकृतपणे उभारलेले तीन मजले कोसळल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. म्हाडा आणि पालिकेकडून टोलवाटोलवी करण्यात येत असली तरी या दुर्घटनेत दोन्ही यंत्रणांच्या अनागोंदीमुळे रहिवासी बळी पडले असून स्थानिकांचा आक्रोश कायम आहे.

Intro:Body:
MH_MUM_03_Dongri_BlDG_COLLAPSE_DAY2_VIS_MH7204684

Visuals and walkthrought by live 3G live7

Cameraman anil Nirmal

पावसामुळं बचाव कार्यात अडथळे

अविरत ढिगारा उपसण्याचे काम सुरू

मुंबई: रिपरिप पावसामुळं बचत कार्यात अडथळे येत असून अविरत बचाव कार्य सुरू आहे.श्वानपथकाच्या मदतीनं सकाळपासून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
डोगरी येथे केसरबाई इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत २२ तासानंतर आतापर्यंत १४ जणांता मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत.
ईटिव्हीचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी घटनास्थळावरुन घेतलेला आढावा....

मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सध्या जखमींना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून लहान मुलांचाही समावेश आहे.

मालाड येथील भिंत कोसळून अनेक जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी साडेअकराच्या सुमारास मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग मंगळवाळी कोसळला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली तब्बल ५० जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफची टिम आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल होऊन मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

डोंगरी येथील तांडेल क्रॉस लेनमधील दुर्घटनाग्रस्त ‘२५ बी, केसरभाई’ इमारतीची जबाबदारी नेमकी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यानंतर संबंधित ट्रस्टने २५ सी आणि २५ बी केसरभाई इमारतीची संरचनात्मक तपासणी करून घेतली. या तपासणीत इमारत अतिधोकादायक असल्याचे उजेडात आल्यामुळे म्हाडाने ही इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली. मात्र, आता कोसळलेल्या इमारतीच्या भागाची जबाबदारी म्हाडाने झटकली आहे. असे असले तरी, म्हाडाच्या एकमजली बांधकामावर अनधिकृतपणे उभारलेले तीन मजले कोसळल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. म्हाडा आणि पालिकेकडून टोलवाटोलवी करण्यात येत असली तरी या दुर्घटनेत दोन्ही यंत्रणांच्या अनागोंदीमुळे रहिवासी बळी पडले असून स्थानिकांचा आक्रोश कायम आहे..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.