ETV Bharat / state

ऑपेरा हाऊस येथील इमारतीचा भाग कोसळला; बचाव पथक घटनास्थळी दाखल

c येथील पारेख सदन या इमारतीचा काही भाग गुरूवारी कोसळला. मात्र, इमारत रिक्त असल्याने जिवीतहानी झालेली नाही.

ऑपेरा हाऊस येथील इमारतीचा भाग कोसळला
author img

By

Published : Sep 6, 2019, 3:22 AM IST

मुंबई - ऑपेरा हाऊस येथील पारेख सदन या इमारतीचा काही भाग गुरूवारी कोसळला. मात्र, इमारत रिक्त असल्याने जिवीतहानी झालेली नाही. मुंबईत अनेक इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. त्यापैकी काही इमारती पुनर्बांधणीसाठी पाडल्या जात आहेत. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा - मुंबईतीत चार दिवसातील पावसाने सप्टेंबर महिन्यातील अकरा वर्षांचा रेकॉर्ड मोडला

ऑपेरा हाऊस, विहार हॉटेल, एसव्हीपी रोड येथील पारेख सदन इमारत मोडकळीस आल्याने रिकामी करण्यात आली होती. तळ अधिक पाच मजली असे या इमारतीचे बांधकाम होते. इमारत मोडकळीस आल्याने इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार होता. त्यासाठी इमारतीचे बांधकाम तोडण्याचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारी अडीच वाजता इमारतीच्या चौथ्या व तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचा काही भाग अचानक कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पालिका वार्ड कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पालिकेच्या आप्तकालिन व्यवस्थापन विभागाने कळवले आहे.

हेही वाचा - पावसाने उडवली स्मार्ट सिटीची दैना - उर्मिला मातोंडकर

Intro:मुंबई - मुंबईत अनेक इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. त्यापैकी काही इमारती पुनर्बांधणीसाठी पाडल्या जात आहेत. अशापैकी ऑपेरा हाऊस येथील पारेख सदन या इमारतीचा काही भाग आज कोसळला. इमारत रिक्त असल्याने जिवीतहानी झालेली नाही. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे. Body:ऑपेरा हाऊस, विहार हॉटेल, एसव्हीपी रोड येथील "पारेख सदन" इमारत मोडकळीस आल्याने रिकामी करण्यात आली होती. तळ अधिक पाच मजली असे या इमारतीचे बांधकाम होते. इमारत मोडकळीस आल्याने इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार होता. त्यासाठी इमारतीचे बांधकाम तोडण्याचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या व तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचा काही भाग अचानक कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पालिका वार्ड कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पालिकेच्या आप्तकालिन व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.