ETV Bharat / state

building collapsed in mumbai : मागील काही वर्षातील प्रमुख घटना

मालवणी परिसरातील तीन मजली इमारतीचे दोन मजले कोसळल्याने आठ मुलांसह अकरा जणांचा मृत्यू झाला होता. यात एकाच परिवारातील 9 जणांचा समावेश होता. या घटनेत रफिक शेख नावाचा व्यक्ती वाचला होता.

building collapsed in mumbai from 2013
मुंबईतील इमारत कोसळल्याच्या घटना
author img

By

Published : Jul 23, 2021, 1:49 PM IST

मुंबई - पावसाळा म्हटले की मुंबईत अनेक इमारत कोसळल्याच्या घटना घडतात. आजसुद्धा मुंबईत एक इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत किती वेळा आणि कुठे कुठे इमारती कोसळल्या, किती जणांचा मृत्यू झाला तर किती जण जखमी झाले? याबाबतचा हा आढावा.

मुंबईतील इमारत कोसळल्याच्या घटना -

  1. 23 जुलै 2021 - मुंबईतील गोवंडी परिसरात इमारत कोसळल्याची घटना घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले. तसेच जखमींमधील काही जण गंभीर आहेत.
  2. 18 जुलै 2021 - मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारत कोसळली. यात तीन जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती बीएमसीने दिली होती.
  3. 25 जून 2021 - इमारतीचे छत कोसळल्याची घटना दक्षिण मुंबईत समोर आली होती. या घटनेदरम्यान, 35 जणांना अग्निशमन दलाने इमारतीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले होते.
  4. 10 जून 2021 - मालवणी परिसरातील तीन मजली इमारतीचे दोन मजले कोसळल्याने आठ मुलांसह अकरा जणांचा मृत्यू झाला होता. यात एकाच परिवारातील 9 जणांचा समावेश होता. या घटनेत रफिक शेख नावाचा व्यक्ती वाचला होता. मात्र, वाचल्यानंतर तो फारच घाबरला होता. त्याला कळत नव्हते की आपला जीव वाचल्यामुळे नशिबाचे आभार मानायचे की, पत्नीसह परिवारातील इतरांचा मृत्यू झाल्यामुळे शोक व्यक्त करायचा. याचा त्याला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. दरम्यान, यावेळी मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे मदत जाहीर केली होती. तर याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला.
  5. 1 फेब्रुवारी 2021 - भिवंडीत सकाळी साडेवाजताच्या सुमारास गोदामाची इमारत कोसळली. याबाबत नागरी संस्थेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती.
  6. 24 सप्टेंबर 2020 - ठाणे जिल्ह्यातील पटेल कंपाऊंड परिसरात भिवंडीतील तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला. तर 25 जणांना वाचविण्यात राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाला (एनडीआरएफ) यश आले होते.
  7. 21 सप्टेंबर 2020 - भिवंडीतील इमारत दुर्घटनेत 20 जण अडकले होते. तर जवळपास दहा जणांचा मृत्यू झाला होता. तर 40 जणांचा वाचविण्यात बचाव पथकाला यश आले होते, याबाबत ठाणे मनपाने माहिती दिली होती.
  8. 25 जून 2018 - भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यात एका 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर नऊ वर्षाच्या मुलीसह एकूण पाच जण जखमी झाले होते. ही घटना खोनी गावात घडली. या घटनेत सात जणांना वाचविण्या यश आले होते.
  9. 25 जुलै 2017 - घाटकोपरमध्ये सिद्धी साई इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत 17 जणांना आपला जीव गमवावा लागला. ही इमारत घाटकोपर (पश्चिम) एलबीएस मार्गावर आहे.
  10. 16 ऑक्टोबर 2017 - सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे बागेसमोरील एका बांधकाम जागेच्या सातव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. तर एक जण जखमी झाला. ही घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली होती. ही साइट पाटे डेव्हलपर्सची आहे. ती तेथे पेट सेया (SEYA) अपार्टमेंट तयार करीत होते.
  11. 4 ऑगस्ट 2015 - ठाणे रेल्वे स्थानकाशेजारी 50 वर्षे जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता. यात एका परिवारातील चार जणांचा सावेश होता. तर अनेक जण जखमी झाले होते.
  12. 27 सप्टेंबर 2013 - मुंबईतील माझगाव परिसरात पाच मजली इमारत कोसळली. यात 61 जणांचा मृत्यू झाला होता. तर 32 जण जखमी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.