ETV Bharat / state

कांदिवलीत चाळीचा भाग कोसळला, 2 जण जखमी, 12 जणांना सुखरूप बाहेर काढले - 2 जखमींना रुग्णालयात केले दाखल

कांदिवली पश्चिम लिंक रोड लालजी पाडा येथे दिपज्योती चाळ आहे. तळ अधिक दोन मजली असलेल्या चाळीचा काही भाग पहाटे 5.15 च्या सुमारास कोसळला. पहाटेची वेळ असल्याने सर्व जण झोपेत होते. या घटनेत 2 जखमी तर 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

building collapsed in kandivali
कांदिवलीत चाळीचा भाग कोसळला
author img

By

Published : May 10, 2020, 9:09 AM IST

Updated : May 10, 2020, 1:48 PM IST

मुंबई - कांदिवली येथील एका चाळीचा काही भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन 12 जणांना सुखरूप बाहेर काढले असून ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का यासाठी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

कांदिवलीत चाळीचा भाग कोसळला

कांदिवली पश्चिम लिंक रोड लालजी पाडा येथे दिपज्योती चाळ आहे. तळ अधिक दोन मजली असलेल्या चाळीचा काही भाग पहाटे 5.15 च्या सुमारास कोसळला. पहाटेची वेळ असल्याने सर्व जण झोपेत असताना ही दुर्घटना घडल्याने ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले. मात्र अग्निशमन दल येण्याआधीच पोलिसांच्या वाहनातून आणि एका खासगी रुग्णवाहिकेतून मधून 2 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

building collapsed in kandivali
कांदिवलीत चाळीचा भाग कोसळला

चाळीचा काही भाग कोसळल्याने काही लोक वरच्या मजल्यावर अडकले होते त्यांना लोखंडी ग्रील तोडून तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 12 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. या ठिकाणी ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शोध मोहीम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : May 10, 2020, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.