ETV Bharat / state

नागपूर फुटाळा तलावात होणार बुद्धीस्ट थीम पार्क

नागपूर त्रिशताब्दी (१७०२-२००२) महोत्सवासाठी घेतलेल्या जागतिक दर्जाच्या बुद्धीस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण आज राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडले.

बैठकीचे दृश्य
बैठकीचे दृश्य
author img

By

Published : Sep 10, 2020, 7:25 PM IST

मुंबई- नागपूर त्रिशताब्दी (१७०२-२००२) महोत्सवासाठी घेतलेल्या जागतिक दर्जाच्या बुद्धीस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण आज राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित एका बैठकीत सादरीकरण झाले.

नागपूर येथील फुटाळा तलाव तेलंगखेडी येथे बौद्ध शिल्प उद्यान प्रकल्प हे शताब्दी महोत्सव समितीच्या कार्यक्रमांतर्गत करण्यासाठी २००१ मध्ये तत्कालीन उत्तर नागपूर मतदार संघाचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याद्वारे पुढाकार घेण्यात आला. त्यामुळे, या प्रकल्पासाठी तत्कालीन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मौजे फुटाळा येथील अंदाजे ११२.५८ हेक्टर जागा ही बौद्ध शिल्प उद्यानाकरिता आरक्षित ठेवण्याचे ठरले होते. प्रस्तावित प्रकल्पाला अंदाजे १ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकडे जगातील सर्व बुद्धीस्ट राष्ट्रे आकर्षित होणार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतील व यामुळे नागपूर हे पर्यटनाचे जागतिक केंद्र म्हणून तयार होणार आहे.

या जागेची मालकी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे असून प्रकल्पासाठी ती संपादित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहे. तसेच, बौद्ध शिल्प उद्यान यात बदल करून याचे नामकरण बुद्धीस्ट थीम पार्क असे करण्यास नागपूर सुधार प्रन्यासाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित बौद्ध शिल्प उद्यानाचे सादरीकरण प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा यांनी केले आहे. बैठकीला जागतिक बँकेचे सल्लागार रवी बनकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.