ETV Bharat / state

Breaking News : औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी - National breaking news

Breaking News
ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jan 21, 2023, 11:27 AM IST

Updated : Jan 21, 2023, 10:18 PM IST

22:17 January 21

औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई - समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांना फोनवरून औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. आयपीसीच्या कलम ५०६ (२) आणि ५०४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबईतील कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

21:22 January 21

साताऱ्यात चोरट्यांनी एका रात्रीत १७ घरे फोडून बारा तोळ्याचे दागिने केले लंपास

सातारा - ऐन थंडीत जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी नागठाणे परिसरातील १७ बंद घरांमध्ये चोरी करत १२ तोळे सोने आणि ७५ हजारांची रोकड लंपास केली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

19:16 January 21

भिशीच्या पैशाच्या वादातून डॉक्टर दांपत्याला बेदम मारहाण

बीड - भिशीच्या पैशाच्या वादातून डॉक्टर दांपत्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

18:40 January 21

भारताने न्यूझीलंडचा केला 8 गडी राखून दारूण पराभव

रायपूर - येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

18:04 January 21

क्रिकेटर उमेश यादवची 44 लाख रुपयांची फसवणूक

नागपूर - क्रिकेटर उमेश यादव याची 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. कोराडी पोलीस स्थानकात उमेश यादवचा पूर्व मॅनेजर शैलेश ठाकरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश यादवने त्याचा मित्र असलेल्या शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँकेचे तसेच इतर व्यवहाराकरता पगारी मॅनेजर म्हणून कामाला ठेवले होते. पण शैलेश ठाकरे याने त्याचा गैरफायदा घेतला.

17:12 January 21

हेन्री शिपलेच्या चेंडूवर रोहितचा पहिला चौकार

रायपूर - छत्तीसगडमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात भारताची फलंदाजी सुरू आहे. 109 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय डावात पहिला चौकार रोहित शर्माने मारला आहे. हेन्री शिपलेने टाकलेल्या अखूड चेंडूवर रोहितने पुल शॉट मारला. डीप मिड-विकेटमध्ये त्यावर चौकार मिळाला.

16:22 January 21

न्यूझीलंड सर्वबाद 108 धावा, भारतापुढे फक्त 109 धावांचे आव्हान

रायपूर - भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात कुलदीप यादवने पहिली विकेट घेतली. शेवटी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 108 धावांवर तंबूत परतला. भारतीय गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. त्याचवेळी पाहुण्यांच्या ढिसाळ फलंदाजीचे दर्शनही दिसून आले.

15:32 January 21

महेश कोठारे यांचे वडिल अंबर कोठारे यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन झाले आहे. ते ज्येष्ठ चित्रपट कर्मी महेश कोठारे यांचे वडिल आहेत. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्मिला कोठारे यांनी ट्विट करुन याची माहिती दिली.

15:15 January 21

शमीच्या बाउन्सरवर मायकेल ब्रेसवेल झेलबाद

रायपूर - शमीच्या बाउन्सरवर मायकेल ब्रेसवेल झेलबाद झाला आहे. बॉल बॅटला नुसता घासून थेट एष्टी रक्षक इशान किशनच्या हातात अगदी पेढ्यासारखा गेला. किशननेही काहीही चूक न करता झेल घेतला आणि न्यूझीलंडचा सातवा गडी बाद झाला.

14:55 January 21

केवळ 15 धावात न्यूझीलंडचे पाच गडी बाद, नामुष्कीचा विक्रमच

एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडसाठी त्यांच्या इतिहासातील पाच विकेट गमावल्यानंतर 15 धावा ही सर्वात कमी धावसंख्या दिसून आली. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स गमावल्यानंतर कोणत्याही संघासाठी ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

14:08 January 21

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इजिप्तचे राष्ट्रपती सिसी असणार प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली - इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे 74 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. परराष्ट्र मंत्रालयाने आज ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अल-सिसी २६ जानेवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत.

13:44 January 21

Breaking News : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

12:39 January 21

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अपघातग्रस्त धनंजय मुंडे यांची निवासस्थानी जाऊन भेट

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची येथील निवासस्थानी भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली. मुंडे यांचा अपघात झाला होता. त्यांना नुकतेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

12:35 January 21

ठाण्यात सुगरण कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांची अचानक भेट

ठाणे - ठाण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यशस्विनी प्रकल्प अंतर्गत सुगरण या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून महिला उद्योजकींना प्रोत्साहन देण्याचे काम सुप्रिया सुळे करत आहेत. या कार्यक्रमाला महिलांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले स्टॉल तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.

12:05 January 21

घाटकोपरमध्ये गतिमंद मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार

मुंबई - घाटकोपरमध्ये गतिमंद मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला होता. या प्रकरणी तीन मुलांची डोंगरी बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

11:44 January 21

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा भेदून घुसखोरीचा प्रयत्न करणारा रामेश्वर मिश्रा अटकेत

मुंबई - एनएसजी कमांडो असल्याचे बनावट ओळखपत्र घेऊन एकजण पंतप्रधानांच्या सुरक्षेत घुसखोरी करत होता. घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्या दहा मिनिटे अगोदर रामेश्वर मिश्रा याला अटक करण्यात आली.

11:39 January 21

गोव्याला जाणारे अझूर एअर चार्टर विमान सुरक्षेच्या कारणास्तव उझबेकिस्तानला वळवले

नवी दिल्ली - गोव्याला जाणारे अझूर एअरचे एक विमान सुरक्षेच्या कारणास्तव उझबेकिस्तानला वळवण्यात आले. रशियाच्या अझूर एअरचे चार्टर विमान, युरोप, आशिया, आफ्रिका आणि मध्य अमेरिकेतील प्रवाशांना घेऊन निघाला होते. त्यात एकूण 238 प्रवासी होते. त्यामध्ये 2 लहान मुले आणि 7 विमान कर्मचारी होते. या विमानाला उडवण्याची धमकी मिळाल्याने हे विमान मध्येच उतरवण्यात आले.

09:40 January 21

Breaking News : शिक्षक भरती घोटाळा! ईडीने तृणमूलच्या कुंतल घोषला केली अटक

नवी दिल्ली : शिक्षक भरती घोटाळा! ईडीने तृणमूलच्या कुंतल घोषला केली अटक

Last Updated : Jan 21, 2023, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.