ETV Bharat / state

मुंबईत उघड्या 'मॅनहोल'मध्ये अडकलेल्या तरुणाला जीवदान, पोलिसांचे कौतुक

पावसाच्या पाण्यातून वाट काढत जाणारा एक 26 वर्षीय तरुण 20 फूट खोल असलेल्या अर्धवट उघड्या मॅनहोलमध्ये अडकला होता. एका पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधाने त्याचा जीव वाचला आहे.

mumbai news  mumbai latest news  mumbai breaking news  mumbai manhole news  mumbai rain news  मुंबई बातमी  मुंबई पाऊस बातमी  मुंबई मॅनहोल बातमी  मुंबई पोलीस बातमी  मुंबई मुसळधार पाऊस बातमी
मुंबई : उघड्या 'मॅनहोल'मध्ये आडकलेल्या तरुणाला जीवदान, पोलिसांचे कौतूक
author img

By

Published : Aug 5, 2020, 7:03 PM IST

मुंबई - मुसळधार पावसामुळे पूर्व उपनगरातील चेंबूर व टिळक नगर उडाणपूल येथील सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामध्येच रस्त्याचा अंदाज न आल्याने एका 26 वर्षीय तरुण 20 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये (ड्रेनजचे उघडे झाकण) अडकला होता. दरम्यान, तत्काळ घटनास्थळी दाखल झालेले पोलीस हवालदार संजय पवार यांच्या प्रसंगवधानामुळे या तरुणाला जीवदान मिळाले असून देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचे प्रचिती आली आहे.

मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे चेंबूर व टिळक नगर परिसर संपूर्ण पाण्याने भरून गेला होता. गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना पायाखालची वाटही दिसत नव्हती. संतोष पवार हा तरुण पाण्यातून वाट काढत अमर महलवरून टिळक नगर उड्डाण पुलाखालून चालत नेहरू नगरकडे होता. दरम्यान, तो पाण्याखालील अर्धे उघडे असलेल्या मॅनहोलमध्ये अडकला. आपले जीव वाचविण्यासाठी तो जीवाचा आटापीटा करू लागला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याला बाहेर निघता येत नव्हते.

दरम्यान, या मार्गवरुन राजन नाडर हे जात होते. त्याच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. लगेच पोलीस हवालदार संजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांंनी घटनास्थळी धाव घेत पालिकेला याबाबत माहिती दिली. संजय पवार यांनी स्वतः पाण्यात उतरुन मॅनहोलमध्ये अडकलेल्या संतोषला तत्काळ बाहेर काढल्याने या तरुणाला जीवदान मिळाले आहे. यामुळे पोलीस हवालदार संजय पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती येथे दिसून आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.