मुंबई : मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. हा दावा विभक्त असलेली त्याची पत्नी आलिया आणि भाऊ शमशुद्दीन यांच्या विरोधात हा दावा दाखल केलेला आहे. पत्नी आणि भाऊ हे दोघेही नवाजउद्दीनला बदनाम करतात. त्याच्यामुळे त्यांनी यापुढे कोणतीही बदनामी करू नये. समाज माध्यमावर त्याबाबतचा कोणताही मजकूर प्रसारित करू नये, अशी देखील मागणी नवाजउद्दीनने याचिकेत केली आहे.
100 कोटी रुपयांची मागणी : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची विभक्त पत्नी अंजना पांडे अर्थात आलिया यांच्यामध्ये वादविवाद सुरू आहे. तसेच नवाजुद्दीनचा भाऊ समशुद्दीन देखील त्यामध्ये पडलेला दिसत आहे. नवाजुद्दीनने आपली विभक्त पत्नी आणि भाऊ हे दिशाभूल करतात. तसेच त्याचा छळ, बदनामी देखील करतात. म्हणून नुकसान भरपाई पोटी 100 कोटी रुपयांची मागणी केलेली. यासंदर्भातील सुनावणी 30 मार्च रोजी होईल.
खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त : सुमारे पंधरा वर्षांपूर्वी नवाजुद्दीन याने आपले बँकेचे व्यवहार आयकर भरणे, त्याबाबतचे व्यवहार किंवा जीएसटी कर भरणे, अशा अनेक व्यवहारांसाठी भावाला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दिले होते. तसेच याबाबतचे अनेक आर्थिक व्यवहार करण्याचे काम विश्वासाने समशुद्दीनवर सोपवले होते. मात्र याचिकेमध्ये फसवणूक केल्याचा दावा केलेला आहे. त्याने नवाजुद्दीनच्या विभक्त पत्नीला नवाजुद्दीनवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले. त्याशिवाय त्यांनी 20 कोटी रुपयांचा आर्थिक गैरवापर केलेला आहे, असे आरोपदेखील केलेले आहे.
थकबाकीची कायदेशीर नोटीस : नवाजुद्दीन याने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ हे देखील मांडलेले आहे की, जेव्हापासून शमशुद्दीनची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली होती. त्याचे वागणे पाहून 2020 मध्ये त्याच्याकडील काम काढून घेण्यात आले होते. त्याला हे काम करायला बंदी घातली होती. त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकीला प्राप्तिकार विभाग जीएसटी विभाग आणि इतर सरकारी विभागांकडून 37 कोटी रुपये थकबाकीची कायदेशीर नोटीस प्राप्त झाली. ही नोटीस समशुद्दीनमुळे प्राप्त झाली, असे देखील त्याने म्हटलेले आहे.
दूरभावना पूर्ण व्यवहार : नवाजुद्दीनने यामध्ये अधोरेखित केलेले आहे की, धाकटा भाऊ समसुद्दीन आणि विभक्त पत्नी यांच्याकडे त्याच्या मालमत्तेची मागणी केली. तेव्हा त्यांनी विविध प्रकारचे व्हिडिओ फोटोज आणि मजकूर समाज माध्यमावर पाठवले. नवाजुद्दीनला त्यामधून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी वाईट व्यवहार केलेला आहे. म्हणून त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा नवाजुद्दीन सिद्दिकी याने दाखल केला आहे. त्याबाबत त्यांनी जाहीर माफी देखील मागावी, अशी याचिकेमध्ये मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत आता तीन एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर नवाजुद्दीनच्या कुटुंबातील सर्वांना हजर राहण्याचे निर्देश आजच्या सुनावणीमध्ये देण्यात आले.