मुंबई Bombay HC Start Telegram Channel : मुंबई उच्च न्यायालयाच्या खटल्याची माहिती आजपासून टेलिग्राम चॅनेलवर मिळणं सुरू झालं आहे. सोशल मीडिया जसं अत्यंत सोपं आणि सहज अॅप्लिकेशन आहे, तसचं टेलिग्रामदेखील आहे. त्यामुळेच आता मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू केली आहे. खटल्याची माहिती टेलिग्रामवर मिळणार असल्यानं त्याचा वादी आणि प्रतिवादींना मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी उच्च न्यायालयाची अपडेट माहिती : मुंबई उच्च न्यायालयाचं संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर न्यायालयाच्या संदर्भातील अनेक प्रकारचे तपशील, माहिती, सूचना पत्रक, आदेश पत्रक, खटल्यांचं निकालपत्र त्यावर दिलं जाते. तसेच त्यामध्ये कोणते खटले उद्या आहेत, किंवा आज आहेत, याची माहिती देखील मिळते. परंतु सर्वसामान्य जनता आणि अशिलांना संकेतस्थळावर ती माहिती शोधणं आणि पाहणं हे जिकरीचं काम आहे. त्यामुळे वकिलांना आणि रोज सराव असलेल्या व्यक्तींनाच ते शक्य होते. https://t.me/bombayhc या मुंबई उच्च न्यायालयाच्या लिंकवर वादी आणि प्रतिवादींना आपल्या खटल्याची माहिती मिळणार आहे.
नोव्हेंबरपासून टेलिग्रामवर खटल्यांची माहिती : आता मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्टर जनरल यांनी 9 नोव्हेंबर 2023 पासून टेलिग्राम चैनलवर उच्च न्यायालयाच्या सर्व खटलांच्या संदर्भात अपडेट माहिती मिळण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर अधिकृत मोबाईल नंबर असेल, त्याला तिथं क्लिककरुन जॉईन होता येईल. त्यामुळे खटल्यांची माहिती त्यालादेखील सहज प्राप्त होऊ शकेल.
टेलिग्रामवर मोठी फाईल सहज उघडता येईल : टेलिग्राम चैनलवर अडीच एमबीपेक्षा जास्त आकाराची पीडीएफ फाईल किंवा वर्ड फाईल सहज पाठवता येतात. डाउनलोडदेखील करता येतात. मात्र जीमेल किंवा व्हाट्सअप या अॅप्लिकेशनमध्ये तितक्या मोठ्या आकाराची पीडीएफ फाईल सहज मिळत नाही. परंतु टेलिग्राम चॅनलवर उच्च न्यायालयाच्या खटल्यांची माहिती मिळताना मोठ्या मोठ्या ऑर्डर जर असतील तर पीडीएफ ऑर्डर सहज त्यावर पाहता येऊ शकतात, वाचता येऊ शकतात. त्यासह सहज डाऊनलोडपण करता येतात. त्यामुळे टेलिग्रामवर खटल्याची माहिती मिळाल्यास मोठा फायदा होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
- दावेदारांना सहज खटल्यांची माहिती मिळेल : उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर वकिलांशिवाय सामान्य नागरिकांना सरावाशिवाय त्यातली माहिती पाहणं, शोधणं, वाचणं मोठं कठीण असते. परंतु टेलिग्रामवर सामान्य जनता खटलांशी संबंधित वादी प्रतिवादी यांना आता ते सहज प्राप्त करता येणार आहे" अशी माहिती उच्च न्यायालयाचे वकील विनोद सातपुते यांनी दिली आहे.
हेही वाचा :