ETV Bharat / state

HC Directs To Pilots: आकासा एअरलाइन्सच्या 43 वैमानिकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे 'उच्च' निर्देश, काय आहे प्रकरण?

HC Directs To Pilots: आकासा एअरलाइन्सच्या 43 वैमानिकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यांनी का असे निर्देश दिलेत, नक्की काय प्रकरण आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Akasa Airlines pilots Resignation issue)

HC Directs To Pilots
आकासा एअरलाइन्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 8:19 PM IST

मुंबई HC Directs To Pilots: आकासा एअरलाइन्स या कंपनीच्या काही कर्मचारी वैमानिकांनी दुसऱ्या कंपनीत नोकरी धरलीय. त्यामुळं आकासानं मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. त्यात म्हटलंय की, त्यांनी पुरेशी सूचना न देता दुसऱ्या कंपनीत नोकरी धरली. वैमानिकांच्या अशा राजीनाम्यामुळं प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालीय. त्यामुळं वैमानिकांनी दिलेल्या राजीनाम्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी आकासा विमान कंपनीनं केलीय. त्या संदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस. एम. मोडक या एकल सदस्य खंडपीठांसमोर सुनावणी झालीय. त्यांनी 43 वैमानिकांना याबाबत लेखी उत्तर मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

वैमानिकांनी केलं कराराचं उल्लंघन : आकासा या एअरलाइन कंपनीमध्ये काम करणाऱ्या वैमानिकांसोबत एक करार झालेला होता. त्या कराराला डावलून वैमानिकांनी आकासाच्या प्रतिस्पर्धी कंपनीसोबत नोकरी धरली. त्यामुळं कराराचं उल्लंघन झालंय. 43 वैमानिकांनी अचानक राजीनामा दिल्यामुळं 21 कोटी 6 लाख रुपयांची भरपाईचीदेखील मागणी आकासाकडून करण्या आलीय. त्यांनी म्हटलंय की, या वैमानिकांच्या राजीनामामुळे फ्लाईट रद्द झाल्या आहेत. अनेक फ्लाईटचं रीशेडूलिंग करावं लागलं. त्यामुळं आकासा एअरलाइनला व्यवसायिक फटका बसलाय. नुकसानापोटी 14 कोटी 28 लाख तर ऑपरेशनल नफा आहे. त्यामध्ये 6 कोटी 96 लाख इतक्या रुपयांचा फटका बसलेला आहे, अशी बाजू ज्येष्ठ वकील दायरीस खंबाटा यांनी न्यायालयात मांडली. (Akasa Airlines pilots Resignation issue)

आकासाचा दावा : आकासा कंपनीच्या वतीनं ज्येष्ठ वकील खंबाटा यांनी हे देखील मांडलंय की, अचानक वैमानिकांनी राजीनामा दिले आहेत. त्यामुळं उड्डाणांमध्ये अडथळा आला. खरंतर आकासा कंपनीची दहा वर्षाची योजना आहे. यामध्ये पायलट त्यांची भरती, त्यांचे सेवाकालीन प्रशिक्षण, त्यांची सेवा उन्नत होण्यासाठी प्रशिक्षण अशा अनेक योजना आहे. त्याच्यावर कामदेखील सुरू आहे. परंतु अचानक वैमानिकांनी राजीनामा दिल्यामुळं समस्या निर्माण झालीय.

वैमानिकांचा राजीनामा : वैमानिकांच्या राजीनाम्यानंतर वैमानिकांची संख्या कमी झालीय. त्यामुळं उड्डाणांवर त्याचा परिणाम झालाय. हे नागरी विमान वाहतूक विभागाकडे देखील मांडलंय. न्यायालयानं देखील याचा आवश्यक विचार करावा, असा कंपनीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी वैमानिकांना कंपनीच्या दाखल दाव्यावर लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत. या संदर्भात पुढील सुनावणी 25 सप्टेंबर रोजी न्यायालयानं निश्चित केलीय.

हेही वाचा :

  1. Kolhapur Mumbai Airlines : कोल्हापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरू, संजय घोडावत यांनी केली 'ही' अपेक्षा व्यक्त
  2. Rakesh Jhunjhunwala राकेश झुनझुनवाला यांचं ते स्वप्न राहिलं अपूर्णच
  3. राकेश झुनझुनवाला आणि आकासा एअरलाइन्सचे अतुट नाते जाणून घ्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.