ETV Bharat / state

Bomb Placed In Mumbai Mantralaya : मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या अन्यथा...; मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी - CM Eknath Shinde

Bomb Placed In Mumbai Mantralaya : गेल्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांशी संवाद न झाल्यास मंत्रालय उडवून देण्याची धमकी एका अज्ञातानं दिलीय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा धास्तावली आहे.

Bomb Placed In Mumbai Mantralaya
Bomb Placed In Mumbai Mantralaya
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 7:31 PM IST

मुंबई Bomb Placed In Mumbai Mantralaya : मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा निनावी फोन (unknown call) आल्यानं सुरक्षा यंत्रणाचं धाबं पुन्हा दणाणलं आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. एका व्यक्तीनं फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचं सांगितल्यानंतर मंत्रालयात सध्या पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. निनावी फोन करणाऱ्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी न बोलल्यास मंत्रालयात बॉम्ब टाकून मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली.

खबरदारी म्हणून मंत्रालयात शोध मोहीम : निनावी कॉल आल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली. श्वान पथकही मंत्रालयात दाखल झालं आहे. पोलीस मंत्रालयाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची तपासणी करत आहेत.

धमकीचं कारण काय : मंत्रालयात धमकीचा फोन करणारी व्यक्ती मूळची अहमदनगरची आहे. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून संवाद साधायचा आहे. या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी धमकी दिली. निनावी फोन करणाऱ्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंशी (CM Eknath Shinde) बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंशी संवाद न झाल्यास मंत्रालय बॉम्बनं उडवून देण्यात येईल, असं धमकी देणाऱ्या अज्ञातानं म्हटलं आहे. अहमदनगर येथून अज्ञातानं फोन केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मंत्रालयात बॅगमध्ये सापडला चाकू : प्रशासकीय इमारतीत चाकू घेऊन जाताना एकाला अटक करण्यात आली आहे. आज सकाळी मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर हा प्रकार घडला. प्रशासकीय इमारतीत चाकू घेऊन जाताना एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. एकाची बॅग स्कॅन करताना त्यात धारदार चाकू आढळून आलाय. पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेतल्यानं त्या व्यक्तीच्या बॅगेतील चाकू जप्त करण्यात आला. हा तरुण उमरगा येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानं बॅगमध्ये चाकू ठेवण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. Special Session Of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार पाच बैठका
  2. Rahul Gandhi Press Conference : अदानींच्या गुंतवणुकीत खरा पैसा कुणाचा? राहुल गांधींचा सवाल
  3. INDIA Alliance Meeting Mumbai : पंतप्रधान मोदी हे एकाच व्यक्तीला पाठिशी का घालतात- राहुल गांधींची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.