मुंबई : चार ऑगस्टला मुंबई पोलीस कंट्रोल रूम या ठिकाणी हरियाणा पोलीस कंट्रोल रूमवरून माहिती देण्यात आली की, अज्ञात व्यक्तीने हरियाणा पोलीस कंट्रोल रूमला फोन करून धमकी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व दिल्ली विमानतळ येथे बॉम्बस्फोट होणार आहे. अशी माहिती मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हरियाणा पोलिसांकडून प्राप्त झाली. त्यानंतर सहार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ५०६ (२), ५०५ (१)(ब), भादवि अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
पाँडिचेरी याठिकाणाहून ताब्यात घेतले : सहार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक तांत्रिक कौशल्याच्या आधारे माहिती प्राप्त करून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पाँडिचेरी या ठिकाणी गेले. आरोपीला पोलीस पथकाने पाँडिचेरी याठिकाणाहून ताब्यात घेतले. नंतर मुंबईत आणून अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेला गुन्ह्यातील आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहार पोलीस करत आहेत.
बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन : मुंबई आणि दिल्लीतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल मुंबई पोलीस कंट्रोलला आला होता. पोलीस कंट्रोल रुममध्ये कॉल आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. दुसऱ्या राज्यातील पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने मुंबई पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन याची माहिती दिली होती.
गुन्हा केला दाखल : पोलीस अधिकाऱ्याने कॉल करुन ही माहिती दिल्याने, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. सुरक्षा दलाने संपूर्ण विमानतळाची तपासणी केली. मात्र, कोणतीच संशयास्पद वस्तू आढळली नव्हती. यानंतर सुरक्षा यंत्रणा कॉल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा तपास करत होत्या. दरम्यान, मुंबई सहार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात ५०३ (२) आणि ५०५ (१)च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -