मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील 50 आणि 60 च्या दशकातील अभिनेत्री आणि अप्रतिम नृत्यांगना अशी ओळख असलेली अभिनेत्री कुमकुम यांचे आज मुंबईत राहत्या घरी निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी जवळपास 100 हिंदी सिनेमांमध्ये काम केले.
हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक हिंदि चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या. यात मदर इंडिया, कोहिनूर, उजाला, एक सपेरा एक लुटेरा, नया दौर, राजा और रंक, गीत, आनखे, ललकार अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. त्यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. भोजपुरी सिनेमा 'गंगा मईया तोहे पियारी चढाईबो' यात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या जाण्याने एक हिंदी चित्रपटसृष्टीने एक रत्न गमावले आहे.