ETV Bharat / state

Actor Armaan Kohli : प्रेयसी मारहाण प्रकरणी बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीला पन्नास लाखांचा दंड

प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीला पन्नास लाखांचा दंड ठोठावला आहे. प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाख रुपये न दिल्यास एफआयआर रद्द करण्याचा आदेश मागे घेतला जाईल, अशी तंबी न्यायालयाने कोहलीला दिली आहे.

Actor Armaan Kohli
Actor Armaan Kohli
author img

By

Published : Jul 12, 2023, 6:37 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीने त्याच्या प्रेयसीला मारहाण केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. त्यानंतर अभिनेता अरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी झाली असता मुंबई उच्च न्यायालयाने कोहलीला चांगलीच तंबी दिली आहे. या प्रकरणात दंड म्हणून 50 लाख रुपये प्रेयसीला न दिल्यास एफआयआर रद्द करण्याचा आदेश न्यायालय मागे घेईल, असे म्हटले आहे.

अन्यथा.. एफआयआर रद्द : 'या' प्रकरणामध्ये प्रेयसीला मारहाण झाल्याचा उल्लेख आहे. जर अरमान कोहलीने तिला पन्नास लाख रुपये दिले नाहीत तर, आम्ही त्याच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याचा पूर्वीचा आदेश मागे घेऊ, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.

भरपाईची 18 जुलैपर्यंत पूर्तता करावी : या संदर्भात अरमान कोहलीने नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा प्रेयसीच्या वकिलांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. कोर्टाने यासंदर्भात दिलेल्या आदेशात अरमान कोहलीने त्याच्या प्रेयसीला 50 लाख रुपये न दिल्यास त्याच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याचा आदेश मागे घेण्यात येईल, असे म्हटले आहे. तसेच नुकसान भरपाईची 18 जुलैपर्यंत पूर्तता करावी,' असेही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे.

कोहलीचा त्याच्या प्रेयसीशी वाद : 2018 मध्ये अरमान कोहली तसेच त्याच्या प्रेयसीत वाद झाला होता. त्यानंतर कोहलीने तिला पायऱ्यांवरून खाली ढकलले होते. या प्रकरणी प्रेयसीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या संदर्भात अरमान कोहलीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर मागे घेण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द करावा अशी विनंती प्रेयसीने केली होती.

हेही वाचा - Mahesh Babu And Sitara : महेश बाबूला मिळाली प्रेमाने भरलेली मीठी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.