मुंबई - बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याने स्वत: इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्याला कोरोनाची तीव्र लक्षणे नसून त्याची प्रकृती ठिक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो गृहविलगीकरणातच राहणार आहे, असेही अर्जुनने सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आपल्या तब्येतीविषयी अपडेट देत राहण्याचे आश्वासन अर्जुनने चाहत्यांना दिले. सध्याची कोरोनाची परिस्थिती सर्वांची परीक्षा पाहणारी आहे. मात्र, आपण सर्वजण या संकटावर लवकरच मात करू, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
अर्जुनने त्याला कोरोना झाल्याची पोस्ट करताच अनेक सेलिब्रेटींनी त्यांची विचारपूस करून लवकर ठीक होण्याच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री कृती सेनॉन, निम्रत कौर, लिसा हेडन, दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी अर्जुनला लवकरात लवकर कोरोनातून बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यापूर्वीही बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. यात ज्येष्ठ कलाकार अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन यांचाही समावेश आहे. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.