ETV Bharat / state

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्यास होणार कारवाई, मुंबई महापालिका काढणार परिपत्रक - bmc action against cracker balsting

कोरोनाच्या संकटामुळे मागील सात महिन्यांपासून विविध सण साजरा करताना सरकारने निर्बंध घातले आहे. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करून सण साजरे करण्यात आले. कोरोना नियंत्रणात असला तरी संकट अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळीही फटाक्याविना साजरी करावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्यास कठोर कारवाई करण्याचा विचार मुंबई महापालिकेकडून केला जात आहे.

फटाके फोडल्यास होणार कारवाई
फटाके फोडल्यास होणार कारवाई
author img

By

Published : Nov 5, 2020, 7:25 PM IST

मुंबई - मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गणेश चतुर्थी, दसरा या सणानंतर आता दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट कायम राहिल्याने यंदाची दिवाळीही फटाक्याविना साजरी करावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. त्यानंतर आता सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर फटाके फोडल्यास साथ नियंत्रण कायद्याखाली कठोर कारवाई करण्याचा विचार मुंबई महापालिकेकडून केला जात आहे. महापालिका याबाबत लवकरच नियमावली जारी करणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता -

दरवर्षी दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. आठ दिवसाआधीच ठिकठिकाणी फटाके विक्रीची दुकाने थाटली जातात. त्यामुळे दिवाळी आधीच फटाके खरेदी करणाऱ्यांची गर्दी होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील सात महिन्यांपासून विविध सण साजरा करताना सरकारने निर्बंध घातले आहे. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करून सण साजरे करण्यात आले. कोरोना नियंत्रणात असला तरी संकट अजूनही कायम आहे. दिवाळी सणात वाढणारी गर्दी व याचवेळी थंडी असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असल्याने सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढू नये, सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी निर्बंध घातले जाणार आहेत.

तर कडक कारवाई होणार-

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, खरेदीसाठी बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कडक नियमावली तयार केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर फटाके विक्री व रस्त्यावर फटाके फोडण्यास बंदी घातली जाणार आहे. त्यामुळे यंदा फटाकेविना दिवाळी साजरी करावी लागणार आहे. रस्त्यावर फटाके फोडताना दिसल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबई महापालिका याबाबत लवकरच नियमावली जारी करणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्यास महाग पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.