ETV Bharat / state

पाण्याची पाइपलाइन दुरुस्ती दरम्यान शॉक लागून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तर 5 जखमी - चुनाभट्टी विभागातील सुमन नगर जंक्शन न्यूज

मुंबईच्या कुर्ला पूर्व सुमन नगर येथील ट्रॅफिक चौकीजवळ पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या पाणी विभागातील सात कर्मचारी गेले होते. त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Oct 19, 2020, 3:12 PM IST

मुंबई - चुनाभट्टी विभागात सुमन नगर जंक्शन जवळ पाण्याच्या पाइपलाइनचे काम करीत असताना पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. तर दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अमोल काळे (३३)आणि गणेश उगले (२८) असे मृत कामगारांचे नाव आहे.

सुमन नगर येथे पालिकेच्या जलवाहिनीचं दुरुस्ती काम सुरु आहे. सकाळी 8 च्या सुमारास पाणीखात्याचे कर्मचारी खड्ड्यात उतरुन ती जलवाहिनी दुरुस्ती करत होते. ही पाईपलाईन दुरुस्त करत असताना पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागला. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली आहे.या घटनेची नेहरू नगर पोलीस चौकशी करीत आहे.

पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू

गणेश दत्तू उगले (45 वर्षे), अमोल काळे (40) या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर नाना पुकळे (41), महेश जाधव (40), नरेश अडांगळे (40), राकेश जाधव ( 39 ), अनिल चव्हाण (43) या पाच जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

दरम्यान, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि पीडितांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी तसेच आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्यावतीने करण्यात येणार आहे. ही माहिती महेंद्र झंकार यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.