ETV Bharat / state

मुंबईतील धोकादायक पुलांवरून एकावेळी एकाच मंडळाची मूर्ती जाणार; विसर्जनाला विलंब होण्याची शक्यता - राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव

एकावेळी एकाच मंडळाची मूर्ती हा प्रकार म्हणजे गणेश भक्तांना भ्रमित करण्याचा असून त्यासाठी योग्य असे नियोजन करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

मुंबई पालिका
author img

By

Published : Sep 11, 2019, 10:54 PM IST

मुंबई - दहा दिवसांच्या जल्लोषानंतर बाप्पाला निरोप द्यायची वेळ उद्यावर ( गुरूवारी) येऊन ठेपली आहे. शहरातील गणेश मुर्तीचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्यासाठी पालिका सज्ज झाली असून धोकादायक पुलांवर विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी एकावेळी एकाच मंडळाची मूर्ती आणि कमीत कमी लोक कसे जातील याकडे लक्ष दिले जाणार आहे. हा प्रकार म्हणजे गणेश भक्तांना भ्रमित करण्याचा असून त्यासाठी योग्य असे नियोजन करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

हेही वाचा - मुंबईतील 'ही' उद्याने राहणार आता २४ तास खुली, पालिका प्रशासनाचा निर्णय

अंधेरी येथील गोखले पूल आणि सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेकडून शहरातील पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यात २९ पूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यापैकी ८ धोकादायक पूल पाडण्यात आले आहेत. तर इतर धोकादायक असलेल्या पुलांवर दुर्घटना घडू नये म्हणून १६ टनापेक्षा जास्त भार टाकू नये, एकावेळी २०० लोकांपेक्षा जास्त लोक मिरवणुकीमध्ये जाऊ नये, पुलांवर नाचगाणी करू नये असे अनेक निर्बंध पालिकेकडून लादण्यात आले आहेत. याचा फटका गणेश विसर्जनाला बसणार आहे. धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या पुलांपैकी चिंचपोकळी पुलावरून २५० ते ३०० मोठ्या गणेशमूर्ती, दादर टिळक पुलावरून १००० ते १५०० छोट्या आणि मोठ्या गणेश मूर्ती, ग्रॅण्ट रोड पुलावरून २०० ते २५० भव्य गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेल्या जातात. धोकादायक पुलावरून गणेश मूर्ती नेताना काही निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे विसर्जनासाठी उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गणेश भक्तांना भ्रमित करण्याचा प्रकार -

हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईत पूल धोकादायक आहेत हे प्रशासनाला माहीत होते. तर गेल्या चार महिन्यात पुलांच्या मजबुतीकरण करण्यासाठी पालिकेने प्रयत्न करायला हवे होते. पुलावर गर्दी होणार आहे का? पुलावर किती लोक व गणेशमुर्ती जाणार आहेत? याची पाहणी कोण करणार आहे असा प्रश्न उपस्थित करत पालिका आणि ट्रॅफिक पोलिसांकडून गणेश भक्तांना भ्रमित केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

नियोजन आणि उपाययोजनांची गरज -

गणेशोत्सवादरम्यान अशी परिस्थिती लोकांची गैरसोय करणारी आहे. दुर्घटना घडू नये म्हणून पालिका प्रशासनाकडून काळजी घेतली जात असली तरी याचे नियोजन आधीच व्हायला पाहिजे होते. लोकांसाठी कार्यरत असलेली मुंबई महापालिका ही खूप मोठी संस्था आहे. असे असताना लोकांना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागत असेल तर ती लोकांची गैरसोय आहे. विसर्जनादरम्यान जे धोकादायक पूल आहेत त्यावरून मिरवणूका नेताना वाहतूक कोंडी होणार आहे. त्यावेळी पालिका प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करावे. तसेच मोठ्या प्रमाणात मुंबईकर रस्त्यावर उतरणार असल्याने पालिकेकडून उपाययोजना अपेक्षित आहेत असे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी म्हटले आहे.

धोकादायक पूल -

घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, चिंचपोकळी (ऑर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज, भायखळा रेल ओव्हर ब्रिज, मारिन लाइन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रॅण्ट रोड-फेरर रेल ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि मुंबई सेंट्रलच्या मध्ये), बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज, वीर सावरकर रेल ओव्हर ब्रिज (गोरेगाव आणि मालाडच्या मध्ये), सुधीर फडके रेल ओव्हर ब्रिज, बोरिवली, दहिसर रेल ओव्हर ब्रिज, मीलन रेल ओव्हर ब्रिज, सांताक्रूझ, विलेपार्ले रेल ओव्हर ब्रिज, गोखले रेल ओव्हर ब्रिज.

हेही वाचा - मुंबई तुंबल्याने १४ हजार कोटींचा फटका, श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

हेही वाचा - 'ना फेरीवाला क्षेत्रा'वर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण; नागरिक त्रस्त

Intro:मुंबई - मुंबईमधील सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. उद्या गुरुवारी दहा दिवसांच्या गणेश मूर्त्यांचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्यासाठी पालिका सज्ज झाली असून धोकादायक पुलांवर विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी एकावेळी एकाच मंडळाची मूर्ती आणि कमीत कमी लोक कसे जातील याकडे लक्ष दिले जाणार आहे. हा प्रकार म्हणजे गणेश भक्तांना भ्रमित करण्याचा असून त्यासाठी योग्य असे नियोजन करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. Body:अंधेरी येथील गोखले पूल आणि सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेकडून शहरातील पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यात २९ पूल धोकादायक असल्याचे समोर आले. त्यापैकी ८ धोकादायक पूल पाडण्यात आले आहेत. तर इतर धोकादायक असलेल्या पुलांवर दुर्घटना घडू नये म्हणून १६ टनापेक्षा जास्त भार टाकू नये, एकावेळी २०० लोकांपेक्षा जास्त लोक मिरवणुकामधून जाऊ नये, पुलांवर नाचगाणी करू नये असे अनेक निर्बंध पालिकेकडून घालण्यात आले आहेत. याचा फटका गणेश विसर्जनाला बसणार आहे. धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या पुलांपैकी चिंचपोकळी पुलावरून २५० ते ३०० मोठ्या गणेशमूर्ती, दादर टिळक पुलावरून १००० ते १५०० छोट्या आणि मोठ्या गणेश मूर्ती, ग्रॅण्ट रोड पुलावरून २०० ते २५० भव्य गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेल्या जातात. धोकादायक पुलावरून गणेश मूर्ती नेताना काही निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे विसर्जनासाठी उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गणेश भक्तांना भ्रमित करण्याचा प्रकार -
हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईत पूल धोकादायक आहेत हे प्रशासनाला माहीत होते. तर गेल्या चार महिन्यात पुलांच्या मजबुतीकरण करण्यासाठी पालिकेने प्रयत्न करायला हवे होते. गणेश विसर्जन उद्यावर आले असताना पालिका आणि ट्रॅफिक पोलीस गणेश भक्तांना भ्रमित करत आहेत हे बरोबर नाही. पुलावर गर्दी होणार आहे का, पुलावर किती लोक जाणार आहेत किती मुर्त्या जाणार आहेत याची पाहणी कोण करणार आहे असा प्रश्न उपस्थित करत पालिका आणि ट्रॅफिक पोलिसांकडून गणेश भक्तांना भ्रमित केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रावी राजा यांनी केला आहे.

नियोजन आणि उपाययोजनांची गरज -
गणेशोत्सवादरम्यान अशी परिस्थिती लोकांची गैरसोय करणारी आहे. दुर्घटना घडू नये म्हणून पालिका प्रशासनाकडून काळजी घेतली जात असली तरी याचे नियोजन आधीच व्हायला पाहिजे होते. लोकांसाठी कार्यरत असलेली मुंबई महापालिका ही खूप मोठी संस्था आहे. असे असताना लोकांना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागत असेल तर ती लोकांची गैरसोय आहे. विसर्जनादरम्यान जे धोकादायक पूल आहेत त्यावरून मिरवणूका नेताना वाहतूक कोंडी होणार आहे. त्यावेळी पालिका प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करावे. तसेच मोठ्या प्रमाणात मुंबईकर रस्त्यावर उतरणार असल्याने पालिकेकडून उपाययोजना अपेक्षित आहेत असे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी म्हटले आहे.

धोकादायक पूल -
घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, चिंचपोकळी (ऑर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज, भायखळा रेल ओव्हर ब्रिज, मारिन लाइन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रॅण्ट रोड - फेरर रेल ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅण्ट रोड आणि मुंबई सेंट्रलच्या मध्ये), बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज, वीर सावरकर रेल ओव्हर ब्रिज (गोरेगाव आणि मालाडच्या मध्ये), सुधीर फडके रेल ओव्हर ब्रिज, बोरिवली, दहिसर रेल ओव्हर ब्रिज, मीलन रेल ओव्हर ब्रिज, सांताक्रूझ, विलेपार्ले रेल ओव्हर ब्रिज, गोखले रेल ओव्हर ब्रिज, अंधेरी

बातमीसाठी विरोधी पक्ष नेते रावी राजा व राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.