ETV Bharat / state

बेकायदेशीर पार्किंग केलेल्या खासगी बसवर पालिका करणार कारवाई; १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी

एकदा कारवाई झाल्यानंतर त्या बसवर जप्तीची कारवाई करताना लिलाव करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात नुकतीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मुंबई
author img

By

Published : Aug 20, 2019, 10:18 AM IST

मुंबई - महानगरपालिकेने खासगी बसेससाठी वाहनतळ उपलबध करून दिली आहेत. या वाहनतळावर वाहन पार्किंग न करता रस्त्यावर वाहने उभी केली जातात. यामुळे ट्रॅफिकची समस्याच निर्माण होत असते. यावर उपाय म्हणून पालिकेने आपल्या पार्किंग धोरणानुसार १ सप्टेंबरपासून खासगी बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पार्किग दंड म्हणून १० हजार रुपये, टोचन शुल्क म्हणून ५ हजार असे एकूण १५ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत.

एकदा कारवाई झाल्यानंतर त्या बसवर जप्तीची कारवाई करताना लिलाव करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात नुकतीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत व गतिमान व्हावी; तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हावी, या उद्देशाने मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना सातत्याने राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून साधारणपणे साडे तीन हजार बसेस पार्क होऊ शकतील, अशा २४ बेस्ट डेपो व ३७ बेस्ट टर्मिनलच्या जागांवर अत्यंत माफक दरात वाहनतळ सुविधा या महिन्यापासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, असे असूनही आतापर्यंत केवळ ४१२ वेळा या सुविधेचा लाभ घेण्यात आला असून अनेक खाजगी बस अजूनही रस्त्यांवर 'पार्क' केल्याचे आढळून येत आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याला चाप लावण्यासाठी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर अनधिकृतपणे 'पार्क' करण्यात आलेल्या बसगाड्यांवर येत्या १ सप्टेंबर पासून पोलिसांच्या सहकार्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईतून बेस्ट बसेस व शालेय बसगाड्यांना वगळण्यात आले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिक सुरळीत व वेगवान व्हावी, या उद्देशाने ७ जुलैपासून मुंबई पोलिसांच्या सहकार्याने अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटरच्या परिसरात आढळून येणाऱया अनधिकृत पार्किंगवर नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे. खासगी बसगाड्यांना 'पार्क' करण्यासाठी २४ बेस्ट डेपो व ३७ बस टर्मिनल येथे अत्यंत माफक दरात वाहनतळाची सुविधा या महिन्यापासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी दिवस व रात्री उपलब्ध असणारी सुविधा लक्षात घेता कमाल ३ हजार ४९५ एवढ्या संख्येने बसगाड्या पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे. मात्र, असे असूनही अनेक प्रकरणी बसचालक किंवा मालक हे या सुविधेचा लाभ न घेता रस्त्यांवर बस पार्क करत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे ही सुविधा सुरु करण्यात आल्यापासून आजवर केवळ ४१२ वेळा खासगी बसगाड्या या बेस्टच्या जागेत पार्क करण्यात आल्या होत्या. म्हणजे सरासरी केवळ २० गाड्या या ठिकाणी 'पार्क' करण्यात आल्या होत्या. तसेच याठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी केवळ ३७९ बसगाड्यांसाठी 'मासिक पास' काढण्यात आले आहेत.

Intro:मुंबई - मुंबई महानगरपालिकेने खासगी बसेससाठी वाहनतळ उपलबध करून दिली आहे. या वाहनतळावर वाहन पार्किंग न करता रस्त्यावर वाहने उभी केली जातात. यामुळे ट्रॅफिकची समस्याच निर्माण होत असते. यावर उपाय म्हणून पालिकेने आपल्या पार्किंग धोरणानुसार १ सप्टेंबरपासून खासगी बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पार्किग दंड म्हणून १० हजार रुपये, टोचन शुल्क म्हणून ५ हजार असे एकूण १५ हजार रुपये वसूल केला जाणार आहे. एकदा कारवाई झाल्यानंतर त्या बसवर जप्तीची कारवाई करताना लिलाव करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात नुकतीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. Body:मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत व गतिमान व्हावी; तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हावी, या उद्देशाने मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना सातत्याने राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून साधारणपणे साडे तीन हजार बसेस पार्क होऊ शकतील, अशा २४ बेस्ट डेपो व ३७ बेस्ट टर्मिनलच्या जागांवर अत्यंत माफक दरात वाहनतळ सुविधा या महिन्यापासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, असे असूनही आतापर्यंत केवळ ४१२ वेळा या सुविधेचा लाभ घेण्यात आला असून अनेक खाजगी बस अजूनही रस्त्यांवर 'पार्क' केल्याचे आढळून येत आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याला चाप लावण्यासाठी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर अनधिकृतपणे 'पार्क' करण्यात आलेल्या बसगाड्यांवर येत्या १ सप्टेंबर पासून पोलिसांच्या सहकार्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईतून बेस्ट बसेस व शालेय बसगाड्यांना वगळण्यात आले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिक सुरळीत व वेगवान व्हावी, या उद्देशाने ७ जुलै पासून मुंबई पोलीसांच्या सहकार्याने अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटरच्या परिसरात आढळून येणा-या अनधिकृत पार्किंगवर नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे. खाजगी बसगाड्यांना 'पार्क' करण्यासाठी २४ बेस्ट डेपो व ३७ बस टर्मिनल येथे अत्यंत माफक दरात वाहनतळाची सुविधा या महिन्यापासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी दिवस व रात्री उपलब्ध असणारी सुविधा लक्षात घेता कमाल ३ हजार ४९५ एवढ्या संख्येने बसगाड्या पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे. मात्र, असे असूनही अनेक प्रकरणी बसचालक किंवा मालक हे या सुविधेचा लाभ न घेता रस्त्यांवर बस पार्क करत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे ही सुविधा सुरु करण्यात आल्यापासून आजवर केवळ ४१२ वेळा खाजगी बसगाड्या या बेस्टच्या जागेत पार्क करण्यात आल्या होत्या. म्हणजे सरासरी केवळ २० गाड्या या ठिकाणी 'पार्क' करण्यात आल्या होत्या. तसेच याठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी केवळ ३७९ बसगाड्यांसाठी 'मासिक पास' काढण्यात आले आहेत.

बातमीसाठी पालिकेचा फोटो किंवा vis वापरावेत Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.