ETV Bharat / state

मुंबई पालिकेकडून रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसाठी 'निवारा गृह'

सीएसटी, दादर, कुर्ला रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पालिकेने 'निवारा गृह' सुरू केले आहे. पालिकेने सीएसटी बोराबाजार येथील मोहनदास शाळा, दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोड वरील गोखले रोड पालिका शाळा, तर कुर्ला पश्चिम येथील मोरेश्वर पाटणकर शाळा या ३ शाळांमध्ये 'निवारा गृह' सुरू केले आहे.

author img

By

Published : Aug 3, 2019, 5:46 PM IST

मुंबई पालिकेकडून रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसाठी 'निवारा गृह'

मुंबई - गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या मुसळधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे, रस्ते वाहतुकीवरही परिणाम होत आहे. रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी तसेच शाळांमध्ये मुंबई महापालिकेने 'निवारा गृह' सुरू केले आहेत. अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगरात शाळा आणि प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सीएसटी, दादर, कुर्ला रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पालिकेने 'निवारा गृह' सुरू केले आहे. पालिकेने सीएसटी बोराबाजार येथील मोहनदास शाळा, दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोड वरील गोखले रोड पालिका शाळा, तर कुर्ला पश्चिम येथील मोरेश्वर पाटणकर शाळा या ३ शाळांमध्ये 'निवारा गृह' सुरू केले आहे.

"अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे." असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यात आज (शनिवार) ३ ऑगस्ट २०१९ रोजीची सुट्टी जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.

या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत -

साईनाथ सबवे, दत्त मंदिर रोड, कृष्णा नगर नाला, किंग सर्कल गांधी मार्केट, एसव्ही रोड नॅशनल कॉलेज वांद्रे, हिंदमाता दादर, ठाकूर सिनेमा कांदिवली, ओबेरॉय जंक्शन.

नागरिकांनी सतर्क राहण्याचा ईशारा -

सायन, दादर, माटुंगा, अंधेरी, गोरेगाव आणि मुंबईत किनारपट्टीलगत भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळेच, जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचत आहे. पुढील २ दिवसदेखील असाच पाऊस कोसळणार आहे, असं हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Intro:मुंबई अपडेट / फ्लॅश
- *सीएसटी, दादर, कुर्ला रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेकडून तीन शाळांमध्ये रिलीफ होम सुरू*

सीएसटी बोराबाजार येथील मोहनदास शाळा

दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोड वरील गोखले रोड पालिका शाळा

तर कुर्ला पश्चिम येथील मोरेश्वर पाटणकर शाळा

यामध्ये पाणी, चहा आणि नास्ताची व्यवस्थाBody:FlashConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.