ETV Bharat / state

'कचऱ्यावरील खर्च करणार तीन पट कमी'

येत्या काळात ज्या ठिकाणी कचरा संकलन होईल त्याच ठिकाणी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाटावर होणाऱ्या खर्चापैकी तीन पट खर्च वाचणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 1, 2020, 11:51 AM IST

मुंबई - मी महापौर झाले त्याचवेळी नागरिकांना रोग मुक्त मुंबई, खड्डे मुक्त रस्ते आणि कचरामुक्त मुंबई देण्याचा संकल्प केला आहे. शहरातील कचरा दोन ते तीन वेळा इतर वाहनांमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जावा लागतो. त्यासाठी पालिकेचा व मुंबईकरांचा तीनपट पैसा वाया जातो. हे पैसे वाचवण्यासाठी नव्या वर्षात प्रयत्न करणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबईकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

बोलताना महापौर किशोरी पेडणेकर

नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येक जण काहीतरी संकल्प करतो. असाच संकल्प मुंबईच्या महापौरांनी केला आहे. मुंबई महापालिकेचे आर्थिक गणित बिघडत असताना पालिकेचा आणि करदात्या मुंबईकरांचे पैसे वाचवण्यासाठी महापौरांनी हा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील कचऱ्यावर होणारा तीनपट खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील कचरा तीन वेळा वेगवेगळ्या वाहनातून नेल्यावर त्याची विल्हेवाट लावली जाते. यासाठी होणार खर्च करदात्या नागरिकांच्या खिशातून होत असतो. यामुळे कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - केईएमच्या निवासी डॉक्टरांसाठी वडाळ्यातील कृष्ठरोग रुग्णालयात वसतिगृह

मुंबईकरांनी दोन झाडे लावावीत

मुंबईत झाडांचे प्रमाण कमी आहे. मुंबईत झाडे वाढवण्यासाठी मुंबईकरांनी आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल त्यावेळी किमान दोन झाडे लावावीत, असे आवाहन महापौरांनी केले. भटक्या प्राण्यांना अन्न मिळावे म्हणून इंदूरच्या धर्तीवर अन्न पेट्या बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन स्थळावर स्वच्छता राखावी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकलचा वापर करावा, पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

त्याऐवजी वाईट सवयी जाळा

31 डिसेंबरला ओल्ड मॅनचा पुतळा जाळला जातो. या पुतळ्यात कागद, चिंध्या आणि इतर वस्तू असतात. यामुळे निर्माण होणाऱ्या धुरातून प्रदूषण होते. प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी आपल्यामधील वाईट सवयी एका कागदावर लिहून त्या पुतळ्या ऐवजी जाळाव्यात त्यासोबत कापूर जाळल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, असे महापौर म्हणाल्या.

हेही वाचा - 'बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा'

Intro:मुंबई - मी महापौर झाले त्याचवेळी नागरिकांना रोग मुक्त मुंबई, खड्डे मुक्त रस्ते आणि कचरामुक्त मुंबई देण्याचा संकल्प केला आहे. शहरातील कचरा दोन ते तीन वेळा इतर वाहनामध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जावा लागतो. त्यासाठी पालिकेचा व मुंबईकरांचा तीन पट पैसा वाया जातो हा पैसा वाचवण्यासाठी नव्या वर्षात प्रयत्न करणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबईकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्या आहेत. Body:नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येक जण काहीतरी संकल्प करतो. असाच संकल्प मुंबईच्या महापौरांनी केला आहे. मुंबई महापालिकेचे आर्थिक गणीत बिघडत असताना पालिकेचा आणि करदात्या मुंबईकरांचा पैसा वाचवण्याचा संकल्प महापौरांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील कचऱ्यावर होणार तीन पट खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील कचरा तीन वेळा वेगवेगळ्या वाहनातून नेल्यावर त्याची विल्हेवाट लावली जाते. यासाठी होणार खर्च करदात्या नागरिकांच्या खिशातून होत असतो. यामुळे कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईकरांनी दोन झाडे लावावीत -
मुंबईत झाडाचे प्रमाण कमी आहे. मुंबईत झाडे वाढवण्यासाठी मुंबईकरांनी आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल त्यावेळी किमान दोन झाडे लावावीत असे आवाहन महापौरांनी केले. भटक्या प्राण्यांना अन्न मिळावे म्हणून इंदोरच्या धर्तीवर अन्न पेट्या बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन स्थळावर स्वच्छता राखावी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकलचा वापर करावा, पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

त्याऐवजी वाईट सवयी जाळा -
३१ डिसेंबरला ओल्ड मॅनचा पुतळा जाळला जातो. या पुतळ्यात कागद, चिंद्या आणि इतर वस्तू असतात. यामुळे निर्माण होणाऱ्या धुरातुन प्रदूषण होते. प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी आपल्यामधील वाईट सवयी एका कागदावर लिहून त्या पुतळ्या ऐवजी जाळाव्यात त्यासोबत कापूर जाळल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असे महापौर म्हणाल्या.

महापौरांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.