ETV Bharat / state

खड्ड्यांसाठी ८५ तक्रारदारांना ४२ हजार ५०० रुपये द्यावे लागणार

बृहन्मुंबई महापालिकेने 'खड्डे दाखवा अन् ५०० रुपये मिळवा' ही योजना सुरू केली होती. यात जर 24 रस्त्यांवरील खड्डे नाही बुजवले तर तक्रारदाला ५०० रुपये देण्यात येणार होते. यात ८७९ जणांनी तक्रारी केल्या होत्या. पण, सुमारे ८५ जणांच्या तक्रारीनंतरही खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे ८५ जणांना तब्बल ४२ हजार ५०० रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत.

मुंबईतील खड्डे
author img

By

Published : Nov 4, 2019, 10:48 PM IST

Updated : Nov 4, 2019, 11:24 PM IST

मुंबई - पावसाळा गेला तरी मुंबईमधील रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने मागील आठवड्यात 'खड्डे दाखवा अन् ५०० रुपये मिळवा' ही योजना सुरू केली होती. याला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या अ‍ॅपवर मागील चार दिवसांत खड्ड्यांच्या ९९७ तक्रारी नोंद झाल्या. यामध्ये पहिल्या तीन दिवसांत दाखल झालेल्या ८७९ तक्रारींपैकी ७९४ खड्डे म्हणजेच ९० टक्के खड्डे २४ तासांत बुजवण्यात आले आहेत. मात्र ८५ खड्डे २४ तासांत बुजवता न आल्याने संबधित वॉर्ड अधिकाऱ्यांना खड्ड्याची तक्रार करणाऱ्या नागरिकांना ४२ हजार ५०० रुपये बक्षिस खिशातून द्यावे लागणार आहे.

खड्ड्यांसाठी ८५ तक्रारदारांना ४२ हजार ५०० रुपये द्यावे लागणार

पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची नेमणूक करून तब्बल ८० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मात्र, तरीही मुंबईत अनेक ठिकाणी खड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मलमपट्टी सुरू असल्याने अल्पावधीतच पुन्हा खड्डे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी खड्डे बुजत नसल्याने मुंबईकरांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे प्रशासनाने अखेर यावर पर्याय शोधत मोठ्या आकाराच्या खड्ड्यांची तक्रार करा आणि तक्रारीनंतर २४ तासांमध्ये ते न बुजल्यास ५०० रुपयांचे बक्षीस देण्याची योजना लागू केली.

त्यावरुन स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटले. बक्षिसाची ही रक्कम संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांच्या खिशातून दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. खड्ड्यांच्या तक्रारी करा आणि २४ तासांत न बुजल्यास ५०० रुपये मिळवा, ही योजना ७ नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र, सुरुवातीलाच याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे योजनेमुळे सात दिवसांत रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात खड्डे बुजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर २४ तासांमध्ये खड्डा न बुजल्यास ५०० रुपये बक्षीस योजना महापालिकेने जाहीर केली आहे. गेल्या शनिवारपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तकारींचा ओघ सुरू आहे. योजना सुरू झाल्यानंतर चार दिवसांत या अ‍ॅपवर ९९७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. मात्र, २४ तासाची डेडलाईन हुकल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना खड्डे न बुजलेल्या ८५ खड्ड्यांचे बक्षीस तक्रारदारांना द्यावे लागणार आहे.

Intro:मुंबई - पावसाळा गेला तरी मुंबईमधील रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने मागील आठवड्यात 'खड्डे दाखवा व ५०० रुपये मिळवा' या योजनेची सुरुवात केली. याला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या अ‍ॅपवर मागील चार दिवसांत खड्ड्यांच्या ९९७ तक्रारी नोंद झाल्या. यामध्ये पहिल्या तीन दिवसांत दाखल झालेल्या ८७९ तक्रारींपैकी ७९४ खड्डे म्हणजेच ९० टक्के खड्डे २४ तासांत बुजवण्यात आले आहेत. मात्र ८५ खड्डे २४ तासांत बुजवता न आल्याने संबधित वॉर्ड अधिका-यांना खडड्याची तक्रार करणा-या नागरिकांना ४२ हजार ५०० रुपये बक्षिस खिशातून द्यावे लागणार आहेत.Body:पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची नेमणूक करून तब्बल ८० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मात्र तरीही मुंबईत अनेक ठिकाणी खड्यानी रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मलमपट्टी सुरू असल्याने अल्पावधीतच पुन्हा खड्डे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी खड्डे बुजत नसल्याने मुंबई करांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे प्रशासनाने अखेर यावर पर्याय शोधत मोठ्या आकाराच्या खड्ड्यांची तक्रार करा आणि तक्रारीनंतर २४ तासांमध्ये ते न बुजल्यास ५०० रुपयांचे बक्षीस देण्याची योजना लागू केली. त्यावरुन स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटले. बक्षिसाची ही रक्कम संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांच्या खिशातून दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. खड्ड्यांच्या तक्रारी करा आणि २४ तासांत न बुजल्यास ५०० रुपये मिळवा ही योजना ७ नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र सुरुवातीलाच याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे योजनेमुळे सात दिवसांत रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात खड्डे बुजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर २४ तासांमध्ये खड्डा न बुजल्यास ५०० रुपये बक्षीस योजना महापालिकेने जाहिर केली आहे. गेल्या शनिवारपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महापालिकेच्या अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तकारींचा ओघ सुरु आहे. योजना सुरु झाल्यानंतर चार दिवसांत या अ‍ॅपवर ९९७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. मात्र २४ तासाची डेडलाईन हुकल्यामुळे संबंधित अधिका-यांना खड्डे न बुजलेल्या ८५ खड्ड्यांचे बक्षिस तक्रारदारांना द्यावे लागणार आहेत.

बातमीसाठी खड्डयांचे vis Conclusion:
Last Updated : Nov 4, 2019, 11:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.