ETV Bharat / state

BMC Action Against Pottery Kilns : प्रदुषणाचा बीएमसीला धसका, बांधकाम व्यावसायिक-सराफानंतर आता पालिकेचा मोर्चा धारावीतील कुंभारवाड्याकडे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 8:39 PM IST

BMC Action Against Pottery Kilns : मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी (Increasing pollution in Mumbai) बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आतापर्यंत बांधकाम व्यावसायिक, मेट्रो, म्हाडा, बुलेट ट्रेन अशा विविध शासकीय कामांना नोटीस पाठवल्या (Pottery kilns in Dharavi) आहेत. त्यासोबतच सोनारांच्या भट्ट्यांवरही कारवाई केली. त्यानंतर आता पालिकेनं आपला मोर्चा धारावीतील कुंभार वाड्याकडे वळवला आहे. (Air pollution issue in Mumbai) पालिका सध्या या भागाचं सर्वेक्षण करत असून लवकरच कारवाई केली जाणार आहे.

BMC Action Against Pottery Kilns
बीएमसी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईविषयी कुंभार व्यावसायिकाचे मत

मुंबई BMC Action Against Pottery Kilns : मुंबईतील प्रदूषणाचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्ली पाठोपाठ सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या आकडेवारीत मुंबईचा क्रमांक लागतो. प्रदूषणाचा वाढता टक्का लक्षात घेता राज्य सरकार सोबतच बृहन्मुंबई महानगरपालिका देखील आता कठोर पावलं उचलताना दिसत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेनं 27 मार्गदर्शक तत्त्वं तयार केली आणि सध्या या नियमांची अंमलबजावणी होत आहे. (BMC action against air pollution in Mumbai)

पालिकेच्या कारवाईनं कुंभार चिंतेत : पालिकेचे विभागीय आयुक्त प्रशांत सकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिका सध्या कुंभारवाड्यातून होणाऱ्या प्रदूषणाचं सर्वेक्षण करत आहे. लवकरच इथल्या प्रदूषणावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता धारावीतील कुंभार व्यावसायिक चिंतेत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात पालिका कारवाईचा विचार करत असल्यानं इथल्या व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कुंभारवाडा इंग्रजांच्या काळापासून : ईटीव्ही भारतने कुंभार व्यावसायिक मितुल चौहान यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "धारावीत कुंभारवाडा तयार झाला तो इंग्रजांच्या काळापासून. इंग्रजांनी आम्हाला व्यवसायासाठी ही जागा दिली आणि तेव्हापासून आजपर्यंत इथं पारंपरिक पद्धतीनं मातीची भांडी तसेच इतर वस्तू बनवण्याचं काम सुरू आहे. आज आमची चौथी ते पाचवी पिढी इथं या व्यवसायात आहे. माझ्या वडिलांसोबत आज मी हा व्यवसाय सांभाळत आहे."

तर प्रशासनासोबत चर्चेची तयारी: बृहन्मुंबई पालिकेने आतापर्यंत तरी आम्हाला प्रदूषण संदर्भात कोणतीही नोटीस किंवा सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, अशा नोटीस किंवा सूचना आल्या तर आम्ही पालिकेसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. येथे आजही पारंपरिक पद्धतीनं भट्टीमध्ये भाजून मातीची भांडी आणि वस्तू तयार केल्या जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड, भुसा यांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात धूर होतो. धारावीत जी नवीन लोक राहायला येतात त्यांना या धुराचा त्रास होतो. मात्र, पिढ्यानपिढ्या इथं राहिल्यानं आम्हाला या धुराची सवय झाली आहे, असे मितुल चौहान बोलले.

गॅस भट्ट्यांचा पर्याय ठरला अपयशी: पूर्वी इथं मोठ्या प्रमाणात मातीची भांडी भाजण्याच्या भट्ट्या होत्या. मात्र, जसा काळ बदलत गेला तसा तरुण पिढीच्या तरुणांचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी या व्यवसायात न उतरता इतर काम करणं किंवा इतर व्यवसायात जाणं पसंत केलं. आज धारावीतील मातीच्या वस्तू भाजण्याच्या भट्ट्यांची संख्या पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहे. भट्ट्या कमी झाल्यानं आम्ही पालिकेशी गॅस भट्ट्या देण्यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र, हा परिसर अतिशय कमी जागेतील असल्यानं ते यशस्वी होऊ शकले नाही.

इलेक्ट्रिक भट्ट्याही बसवणं अशक्य : धारावीतून मोठ्या प्रमाणात भट्ट्यांचा धूर बाहेर पडतो. त्यावर पालिका कारवाईच्या भूमिकेत असली तरी, सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे पालिकेनं आम्हाला थोडा वेळ द्यावा. पारंपरिक भट्ट्या सोडून त्यात बदल करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले. त्यात इलेक्ट्रिक भट्ट्या आणि गॅस भट्ट्या असे दोन पर्याय आमच्यासमोर होते. गॅस भट्ट्या सुरू करणं हे धोकादायक असल्याचं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही इलेक्ट्रिक भट्ट्यांचा अभ्यास केला. मात्र, इथं इलेक्ट्रिक भट्ट्या बसवणं आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा येथे आणणं हे फारच खर्चिक होतं. त्यामुळे हे दोन्ही पर्याय बाद झाले. परिणामी, आजही आम्ही पारंपरिक पद्धतीनं लाकूड आणि भुसाचा वापर करून मातीची भांडी भाजत आहोत. त्यामुळे प्रदूषणासंदर्भात आधी आम्ही पालिकेशी चर्चा करू. त्यानंतरच पालिकेनं कारवाई करावी, असेही मत कुंभार व्यावसायिक मितुल चौहान यांनी मांडलं.

हेही वाचा:

  1. Mumbai Delhi Pollution : मुंबई-दिल्लीच्या धर्तीवर प्रदूषणाची पातळी नियमित राखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज
  2. 'ईटीव्ही भारत' विशेष : मुंबईतील वायू प्रदूषणावर मात करण्याची हीच वेळ - हवामान अभ्यासक भगवान केशभट
  3. प्रदूषणाच्या शर्यतीत लवकरच मुंबई करणार दिल्लीला 'ओव्हरटेक'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.