ETV Bharat / state

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात रक्तदान शिबिर,आमदार रवींद्र वायकर यांचा पुढाकार - आमदार रवींद्र वायकर

आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगश्वरी विधानसभेच्या वतीने रक्तदान शिबिरे घेण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये आज (वॉर्ड क्र. ७७०)चे नगरसेवक अनंत नर व शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर यांनी मेघवाडी येथील शाखेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात रक्तदान शिबीर

author img

By

Published : May 30, 2021, 5:46 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन मिळून काम करत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, उत्तम सहकार्य करत आहेत. परंतु सध्या रुणांसाठी रक्तसाठा आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केलेले आहे.

आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगश्वरी विधानसभेच्या वतीने रक्तदान शिबिरे घेण्यास सुरुवात झाली आहे

आमदार रवींद्र वायकर यांचा पुढाकार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगश्वरी विधानसभेच्या वतीने रक्तदान शिबिरे घेण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आज (वॉर्ड क्र. ७७०)चे नगरसेवक अनंत नर व शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर यांनी मेघवाडी येथील शाखेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रविवारी दिनांक (०६ जून) २०२१ रोजी द. गो. वायकर स्मृती सभागृह, इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्यामनगर तलाव, जोगेश्वरी पूर्व, मुंबई ६० येथे व आरे जिम्नॅशियम, आरे चेकनाका, गोरेगाव (पूर्व) येथे आयेजित केले आहे.

सकाळी (९.०० ते दुपारी २.००) वाजेपर्यंत आयोजन

युवासेनेचे विभाग अधिकारी अमित पेडणेकर यांनी जोगेश्वरी सातबावडी येथे शिबिर आयोजित केलेले आहे. अशा तीन ठिकाणी सकाळी (९.०० ते दुपारी २.००) वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जोगेश्वरी येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरातील रक्त संकलन करण्यासाठी सेव्हनहिल हॉस्पिटलमधील रक्तपेढी व गोरेगाव येथील शिबिरातील रक्त संकलन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयातील रक्तपेढीतील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.