मुंबई : टिपू सुलतान नामकरणाच्या वादावरून भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेर्या सुरू आहेत.
सत्तेवर येण्या आधी कर्नाटकमध्ये भाजपचे नेते येदुराप्पा हे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निर्णय बदलला.
तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतान यांना धाडसी शहीदाचा दर्जा देताना देश त्यांना विसरु शकत नाही, असे भाषण केले होते. याची आठवणही भाजपला नवाब मलिक यांनी याआधी करुन दिली होती.