ETV Bharat / state

BJP Vs Shinde Group : भाजपकडून शिंदेंच्या सेनेवर दबाव अस्त्र; आगामी निवडणुकीत जागा वाटपात मिळणार दुय्यम स्थान

लोकसभा, राज्यसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपकडून दबाव अस्त्र वापरण्यात येत असून जागा वाटपातही दुय्यम स्थान मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिंदे गटात यामुळे मोठी नाराजी आहे.

BJP Vs Shinde Group
BJP Vs Shinde Group
author img

By

Published : May 27, 2023, 5:56 PM IST

वैजनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे भाजपच्या पाठिंब्यावर सरकार आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर सुरत व्हाया गुवाहाटीमार्गे एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, महाशक्ती पाठीशी आहे, अशी कबुली त्यांनी दिली होती. राजकीय उलथापालथीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा सातत्याने वाढत आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही दिल्लीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर झाला. विरोधकांनी यावरून शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. खासदार संजय राऊत यांनी तर, शिंदे गटाची तुलना दिल्लीच्या हातच्या बाहुलीशी केली होती. हा वाद पेटला असतानाच भाजपने आगामी निवडणुकीत राज्यसभेच्या 240, लोकसभेच्या 48 जागा लढवण्याची घोषणा करीत शिंदे गटाला हादरा दिला होता. आता पुन्हा एकदा भाजपकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढवली आहे.

गेल्या वेळेस तुमच्या 2019 ला जो फॉर्मुला ठरला होता. भारतीय जनता पार्टीचा, शिवसेनेचा, त्याच धर्तीवर शिवसेनेला 22 जागा देण्यात याव्या. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने एक मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये शिवसेनेला घटकपक्ष म्हणून सहकार्य करावे. - वैजनाथ वाघमारे, शिवसेना शिंदे गट राज्य समन्वयक

जागा वाटपात शिंदेंना दुय्यम स्थान : लोकसभा, राज्यसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकींसाठी मोर्चेबांधणी, रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपने देखील महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48, विधानसभेच्या 288 जागांचा आढावा घेत आहे. राज्यात एकहाती सत्तेत राहायचे असेल तर, बहुमताचा आकडा पार करणे गरजेचे आहे. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट सत्तेत आहे. आगामी निवडणुकीत समान जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, भाजपने 248 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघात चाचपणी करण्यात येत आहे. शिंदे गटाला यामुळे दुय्यम स्थान मिळण्याची शक्यता असल्याने धाकधूक वाढली आहे.

कोणताही दबाव नाही : खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजप आम्हाला सापत्नक वागणूक देते. आमची काम होत नाही, असा आरोप केला आहे. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या वेळेस तुमच्या 2019 ला जो फॉर्मुला ठरला होता. भारतीय जनता पार्टीचा, शिवसेनेचा, त्याच धर्तीवर शिवसेनेला 22 जागा देण्यात याव्या. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने एक मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये शिवसेनेला घटकपक्ष म्हणून सहकार्य करावे. आमच्यावर कोणत्याही पक्षाचा दबाव नाही, किंवा आम्ही ही त्यांच्यावरती टाकत नाही. महाराष्ट्रातील सत्ता कारणासाठी एकत्र आलो असून मिळून मिसळून काम करू. भारतीय जनता पार्टी देखील त्याला अनुमोदन देतील. या सर्व विषयावर दोन्ही पक्ष एकत्र बसून यावर समर्पक चर्चा करून निर्णय घेतील, असे शिवसेना शिंदे गट राज्य समन्वयक वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले.

हेही वाचा -

Maharashtra political Crisis : विधानसभा अध्यक्ष ॲक्शन मोडवर, निवडणूक आयोगाकडे मागितली शिवसेनेची घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.