ETV Bharat / state

Jayant Patil News: ईडीची सांगलीत छापेमारी सुरू असताना भाजपच्या निशाण्यावर जयंत पाटील, पक्षातील नाराजीवरून उडविली खिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची भूमिका घेतली होती. तेव्हा भर बैठकीत ढसाढसा रडणारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षात नाराज असून पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगत याला आणखी हवा दिली होती. आता महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर वरून जयंत पाटील यांच्याविषयी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये जयंत पाटील राष्ट्रवादी पक्ष का सोडणार याची १० कारणे सांगितली गेली आहेत. भाजपकडून करण्यात आलेल्या या ट्वीटनंतर जयंत पाटील पक्षात खरोखर नाराज आहेत का? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

author img

By

Published : Jun 25, 2023, 12:25 PM IST

Jayant Patil News
जयंत पाटील
भाजपने ट्विट केलेला व्हिडिओ

मुंबई : भाजपकडून ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी मागच्या दिवसात जे काही निवृत्ती नाट्य रंगवले होते, त्या नाट्यामध्ये शरद पवार यांच्या व्यतिरिक्त जयंत पाटील यांनी बेस्ट परफॉर्म केले. किती रडले होते ते? पण आता समजले आहे की, जयंत पाटलांचे ते अश्रू खरे होते केवळ कारण वेगळे होते. म्हणूनच नाराज असलेले जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. अशात जयंत पाटलांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी १ नाही तर १० कारणे आहेत.

नाराजीची कारणे : शरद पवार यांनी २०१९ पासून यांनी जयंत पाटलांना डावलायला सुरुवात केली. एकेकाळी गृह मंत्रालयासारखे खाते भूषवणाऱ्या जयंत पाटलांना जलसंधारण सारखे मंत्रालय देऊन त्यांची नाचक्की केली गेली. अशात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे दोन गट आहेत, परंतु जयंत पाटील हे दोघांपैकी कुठल्याही गटात नाहीत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीतले भविष्य अंधारातच राहिले गेले. अशात जयंत पाटील फार महत्वाकांक्षी आहेत. त्यात त्यांना पडणारी उपमुख्यमंत्रिपदाची स्वप्ने कुणापासून लपून राहिलेली नाही आहेत. आता तर पक्षाचा राष्ट्रीयत्वाचा मानही गेला आहे. एकीकडे सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी आल्यामुळे अजित पवारांचेच स्वतःचे वांदे झाले आहेत. तेव्हा जयंत पाटील यांच्या स्वप्नाला कोण विचारणार? महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर जयंत पाटील यांना विरोधी पक्षाचे नेतेपद भूषवायचे होते, तेव्हा सुद्धा पाटलांची झोळी रिकामीच राहिली.

पाटलांना फक्त ठेंगाच : शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्ष निवडताना दोन्ही गटाला समाधानी केले. एकीकडे सुप्रिया सुळे यांना तर दुसरीकडे अजित पवार यांचे खंदे समर्थक अशी ओळख असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवले. अशात पाटलांना फक्त ठेंगाचं मिळाला आहे. राज्याचे सर्व निर्णय आता अजित पवार घेत आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय स्तरावर राजकारणाची धुरा सर्वेसर्वा शरद पवारांच्या हातात आहे. त्यामुळे जयंत पाटील हे नावासाठी नाममात्र प्रदेशाध्यक्ष आहेत. अशात शरद पवार पुढे चुकून कधी निवृत्त झालेच, तर स्वत:ला वरिष्ठ समजणाऱ्या जयंत पाटील यांना सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या हाताखाली काम करणे फारच कठीण होऊन जाईल.

जयंत पाटील यांच्याबद्दल ट्विट : जयंत पाटालांना सुद्धा आता शरद पवारांसारखेच आपल्या मुलाला राजकारणात आणायचे आहे. नुकतेच जयंत पाटलांनी त्यांचा मुलगा प्रतिक याला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून निवडून आणले आहे. पण इथे स्वत:च्या सख्या पुतण्याला डावलणारे पवारसाहेब जयंतरावांच्या मुलाला कसे पुढे येऊ देणार? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

ईडीच्या चौकशीनंतर प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा- जयंत पाटील यांच्याबद्दल ट्विट करून प्रसारित केलेल्या या व्हिडिओबद्दल अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा जयंत पाटलांकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही आहे. जयंत पाटील यांना यापूर्वी ईडीने नोटीस पाठविली होती. जयंत पाटील यांच्यांशी संबंधित राजाराम बापू सहकारी बँकेतील काही खात्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. नुकते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संघटनेत काही जबाबदारी द्या, असे जाहीर कार्यक्रमात म्हटले. दुसरीकडे जयंत पाटील यांच्याकडे पाच वर्षे प्रदेशाध्यक्षपद असल्याचे म्हटले. त्यानंतर जयंत पाटील यांच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीत चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :

  1. KCR Visit Pandharpur : के.चंद्रशेखर राव येणार पंढरीच्या वारीला, विठुरायांच्या भेटीमागे काय आहे राजकीय गणित?
  2. Ajit Pawar News : अजित पवारांच्या सभेआधीच पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर; सभेच्या समोरच लावले बॅनर
  3. Sharad Pawar News: एकनाथ शिंदे प्रश्नांची जाण असणारे मुख्यमंत्री- शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.