ETV Bharat / state

'सत्ता येणार, असे सांगून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न'

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली. मात्र, 'सत्ता येणार...सत्ता येणार' असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत.

minister nawab malik
मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Jun 2, 2021, 12:41 PM IST

Updated : Jun 2, 2021, 1:26 PM IST

मुंबई - राज्यात भाजपची सत्ता येणार, ही त्यांची भविष्यवाणी आहे, जी कधीही सत्य होणार नाही. त्यामुळेच ते हताश होवून आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत असल्याची टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परतून जावू नये, या भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे सांगत आहेत. मात्र, तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहे, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

याबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री नवाब मलिक

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली. मात्र, 'सत्ता येणार...सत्ता येणार' असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - चंद्रकांत पाटलांना उपचाराची गरज, संजय राऊतांची टीका

बारावीच्या परीक्षेबाबत अभ्यास करून निर्णय -

पंतप्रधानांनी सीबीएसईच्याबाबतीत निर्णय घेतला आहे. मात्र, राज्य सरकार बारावीच्या स्टेट बोर्डच्या बाबतीत सखोल अभ्यास करून निर्णय घेईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. पंतप्रधानांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. घोषणा करणे आणि त्या घोषणेनंतर काय पर्याय उपलब्ध आहेत? याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील बारावीच्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर होताना त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल? याचा सगळा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jun 2, 2021, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.