ETV Bharat / state

निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या मनसेसाठी, भाजपची यंत्रणा कार्यरत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नांदेड आणि सोलापूरच्या सभेत टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपच्या सोशल मीडिया सेलने विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्लिप तयार करून व्हायरल केल्या आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या मनसेसाठी, भाजपची यंत्रणा कार्यरत
author img

By

Published : Apr 16, 2019, 5:27 PM IST

मुंबई - लोकसभेच्या रिंगणात नसलेल्या मनसेसोबत भाजपचा शाब्दिक वाद सुरू आहे. मनसेच्या प्रश्नना उत्तर देण्यासाठी भाजपने आपली यंत्रणा कामाला लावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नांदेड आणि सोलापूरच्या सभेत टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपच्या सोशल मीडिया सेलने विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्लिप तयार करून व्हायरल केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपात जरासेही तथ्य नसल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीजचा शो आहे. या शोमध्ये त्यांनी जुन्याच फिल्म दाखवल्या, अशी खिल्लीही तावडे यांनी उडवली आहे. सरकारच्या योजना फसल्या असत्या, जर आम्ही थापा मारल्या असत्या तर त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका. ग्रामपंचायत, महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने जिंकल्या नसत्या, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या मनसेसाठी, भाजपची यंत्रणा कार्यरत

देशातल्या आणि राज्यातल्या प्रत्येक निवडणूक भाजप जिंकत जाते आणि मनसे संपत जाते याचे कारण काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्यानेच ग्रामपंचायत, जिल्हापरिषद निवडणुकीतही भाजपला विजय मिळत आहे. याचे उत्तर राज ठाकरे यांनी कुठेतरी शोधायला पाहिजे असेही तावडे यावेळी म्हणाले.

तावडे यांनी दिलेले उत्तर अतिशय केविलवाणे आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपकडे कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे भाजप घाबरला असून सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने खोटे व्हिडिओ तयार केले जात असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.

Intro:निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या मनसेसाठी , भाजपची यंत्रणा कार्यरत..

मुंबई 16

लोकसभेच्या रिंगणात नसलेल्या मनसे सोबत भाजपचा पमग सुरू असून मनसेच्या प्रश्नना उत्तर देण्यासाठी भाजपने आपली यंत्रणा कामाला लावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नांदेड आणि सोलापूरच्या सभेत टीका केल्या या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपच्या सोशल मीडिया सेल ने विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्लिप तयार करून वायरल केल्या आहेत. वाढवणाऱ्या मनसे साठी भाजपने आपली यंत्रणा कामी लावली आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपात जरासे हि तथ्य नसल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीज चा शो होता. या शो मधे त्यांनी जुन्याच फ़िल्म दाखवल्या अशी खिल्ली ही तावडे यांनी उडवली आहे.
सरकारच्या योजना फसल्या असत्या, जर आम्ही थापा मारल्या असत्या तर त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका. ग्रामपंचायत,महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने जिंकले नसते असेही त्यांनी सांगितले. देशातल्या आणि राज्यातल्या प्रत्येक निवडणूक भाजप जिंकत जाते आणि मनसे संपत जाते कारण काय? असा सवालही त्यांनी केला. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचत असल्यानेच ग्रामपंचायत , जिल्हापरिषद निवडणुकीतही भाजपला विजय मिळतोय. याचे उत्तर राज ठाकरे यांनी कुठेतरी शोधलं पाहिजे असंही तावडे म्हणाले.
दरम्यान, तावडे यांनी दिलेले उत्तर अतिशय केविलवाणे आहे. राज ठाकरे यांनी उपस्तिथ केलेल्या प्रश्नांवर भाजपकडे कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे भाजप घाबरला असून सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने खोटे विडिओ तयार केले असल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. Body:......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.