ETV Bharat / state

विधानपरिषद निवडणूक : भाजपचा खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी - विधानपरिषद निवडणूक बातमी

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : May 8, 2020, 2:08 PM IST

Updated : May 8, 2020, 2:54 PM IST

मुंबई - येणाऱ्या 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. प्रविण दटके,गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

  • Bharatiya Janata Party (BJP) releases list of candidates for biennial elections for Maharashtra Legislative council scheduled to be held on 21st May. pic.twitter.com/0QB8JL3kAE

    — ANI (@ANI) May 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांनाही उमेदवारी देण्यास भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील श्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला लाल कंदील मिळाला. त्यामुळे त्यांचे राजकीय पूनर्वसन होणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीत बावनकुळे आणि खडसे यांचे तिकिट नाकारण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या विधानपरिषदेत त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा भाजप नेते व कार्यकर्त्यांना होती. विधानपरिषदेबाबात एकनाथ खडसे यांनी इच्छाही व्यक्त केली होती. पण, यंदाही त्यांच्या पदरी निराश आली आहे.

परळी विधानसभा मतदार संघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार, असा विश्वास अनेकांना होता. त्यासाठी स्वतः मुंडे यांनी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली होती. पण, त्यांचेही नाव यातून वगळण्यात आले आहे.

या ऐवजी अजित पवारांविरोधात भाजपकडून निवडणूक लढविलेले गोपीचंद पडळकरांना भाजपने संधी दिली आहे. तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत माढा लोकसभा मतदारसंघात आणि माळशिरस विधानसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलविण्यात अकलूजच्या मोहिते-पाटील यांचा सिंहाचे वाटा आहे. तर प्रविण दटके हे नागपूर माजी महापौर आहेत. यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - 'करमाड रेल्वे अपघाताने मनाला यातना; स्थलांतरीत मजुरांसाठी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करा'

Last Updated : May 8, 2020, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.