ETV Bharat / state

Ajit Pawar: अजित पवारांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे वक्तव्य भोवले - Leader of Opposition Ajit Pawar

विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला चपला मारून रोष (Ajit Pawar photograph vandalized by BJP) व्यक्त केला. खुलेनाट्यगृह चौकात केलेल्या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोधात घोषणाबाजी (BJP Protest In Akola) केली.

Leader of Opposition Ajit Pawar
विरोधी पक्षनेते अजित पवार
author img

By

Published : Jan 3, 2023, 3:38 PM IST

Updated : Jan 3, 2023, 10:21 PM IST

अजित पवारांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन

अकोला : विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या बद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. यामुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापले असताना इतिहासकारांनी यासंदर्भात आश्चर्य व्यक्त केले आहे. तर भाजपने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त (Ajit Pawar photograph vandalized by BJP) करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बद्दल आंदोलन (BJP Protest In Akola) केले आहे. (Latest news from Akola)

पवारांविरुद्ध नारेबाजी : शहरातील खुलेनाट्यगृह चौकात आंदोलन करीत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला चपला मारून रोष व्यक्त केला. या आंदोलनात आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या विरोधात भाजपा आक्रमक झाली असून पुण्यामध्ये अजित पावरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ब्राह्मण महसंघाकडून संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आले आहे.

अमरावती - अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत भाजयुमोने राजापेठ उड्डाणपुलावर मोर्चा काढून घोषणाबाजी करत निषेध केला गेला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या फोटोला चपला मारून, बॅनर फाडून निषेध करण्यात आला.

सातारा - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. राजधानी साताऱ्यात भाजप युवा मोर्चाच्यावतीने अजितदादांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट करत घोषणाबाजी करण्यात आली. अजितदादांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला.

नाशिक - छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असे अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आंदोलनं करण्यात आले. यावेळी पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

बुलडाणा - राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अजित पवार यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप महिला आघडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बारामती - बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. भाजपच्या वतीने भिगवन चौकात हे आंदोलन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

अहमदनगर (शिर्डी) - अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत समाचार घेतला. भरकटलेल्‍या महाविकास आघाडीत एकवाक्‍यता राहीलेली नाही. त्‍यामुळेच नैराष्‍येच्‍या भावनेतून ते संभाजी महारांजाबद्दल बेताल वक्‍तव्‍य करीत असल्याची टीका विखे यांनी केली. सोयीनुसार इतिहासामधील दाखले देणाऱ्यांना छत्रपती संभाजी महाराजांचे कसे बलिदान मान्‍य होणार? असा प्रश्‍न भाजपा नेते, महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. अजित पवारांच्या वक्‍तव्‍याचा निषेध करण्‍यासाठी शिर्डी येथे मंत्री विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते.

अजित पवार काय म्हणाले होते? - आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काहीजण त्यांना धर्मवीर म्हणतात. मात्र, राजे हे धर्मवीर नव्हते, असे अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान म्हटले होते. त्यानंतर आता अजितदादांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. या वादात आता भाजपने उडी घेतली आहे. अजित पवारांविरोधात राज्यभर निदर्षने देखील केली जात आहेत.

संभाजीराजे यांनी सुनावले - छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते, आहेत आणि पुढेही राहतील, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी अजित पवार यांना अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचाही निषेध त्यांनी केला आहे. अजित पवार यांनी अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. अजित पवारांचे विधान हे अर्धसत्य आहे. तेव्हा त्यांनी ते विधान मागे घ्यावे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे. त्याचवेळी त्यांना आव्हानही दिले आहे. अजित पवार यांनी कोणता ऐतिहासिक संदर्भ जोडला तेही सांगावे, असे संभाजीराजे म्हणाले.

ठिकठिकाणी आंदोलन - जित पवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप मुंबईत आंदोलन करणार आहे. याआधी पुणे-नाशिकमध्येही अजित पवारांविरोधात भाजपनं आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार निदर्शने केली. पुण्यात खंडोजीबाबा चौक छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक अजित पवार यांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आले. तर नाशिकमध्येही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.

Last Updated : Jan 3, 2023, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.