मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे २ दिवस महाराष्ट्रात चक्रीय प्रवासात आहेत. नड्डा उद्या दुपारी मुंबईत दाखल होतील.त्यानंतर त्यांचा मुंबईत भरगच्च असा कार्यक्रम असून १८ तारखेला दुपारी दीड वाजता ते पुण्याला रवाना होतील. आता झालेल्या कर्नाटकातील पराभवानंतर जेपी नड्डा यांचा महाराष्ट्रातील हा दौरा संघटना बांधणीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.
लाभार्थ्यांबरोबर संवाद: कर्नाटकमध्ये झालेल्या पराभवाचे आत्मकथन करण्यामध्ये भाजप गुंतलेली असताना, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसीय चक्रीय प्रवासाच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत आहेत. या त्यांच्या प्रवासाचे प्रमुख, खासदार मनोज कोटक हे असणार आहेत. उद्या दुपारी अकरा वाजता जेपी नड्डा यांचे मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते देवनार येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, घाटकोपर येथे लोकसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत व या लाभार्थ्यांबरोबर भेटलेला फीडबॅक केंद्राला पाठवला जाणार असल्याचंही, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितल आहे.
दलित मित्राच्या घरी भोजनाचा आस्वाद: त्यानंतर जेपी नड्डा आहे रमाबाई आंबेडकर नगर येथे असलेल्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. एका दलित मित्र कार्यकर्त्याच्या घरी दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. त्यानंतर बोरवली शिंपोली येथे अटल स्मृती उद्यान इंटेलेक्च्युअल केंद्रात विविध समाजातील 50 मान्यवरांची ते संवाद साधणार आहेत व त्यानंतर त्यांच्याबरोबर चहा पाण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमानंतर चारकोप येथे आमदार योगेश सागर यांच्या मतदारसंघात, पन्ना प्रमुखांची सर्व व्यवस्था कशा पद्धतीचे असते याचा आढावा ते घेणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एका वार्डात पन्ना प्रमुखांचे आदर्श रचना कशी आहे, हे बघून त्या पद्धतीने त्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. त्यानंतर वेस्टन एक्सप्रेस हायवे येथे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथे असलेल्या अटलजींच्या पूर्णकृती पुतळ्याला ते अभिवादन करून, डॉक्टर सोमा घोष यांच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम सुद्धा आहे. तसेच मुंबईत ५२ आघाड्यांचा, मोर्चाची व्यवस्था याबाबत संमेलन व त्यांच्या सोबत बैठक होणार आहे. रात्री १० वाजता सह्याद्री अतिथी गृहात मुंबई कोअर कमिटीची बैठक व भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पुण्यात प्रदेश कार्यकारणीची बैठक: गुरुवारी १८ तारखेला सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयाला भेट, व त्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला जेपी नड्डा जाणार आहेत. त्यानंतर साडेदहा वाजता रवींद्रनाथ नाट्य मंदिरात युवकांशी संवाद साधून, स्किल डेव्हलपमेंट बाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर दादर येथील सावरकर सदन स्वतंत्रवीर सावरकर यांचे निवासस्थान येथे त्यांच्या परिवारातील लोकांच्या भेटीगाठी व संग्रहालयाची पाहणी ते करणार आहेत. दुपारी संघटन मंत्री विनोद तावडे यांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानंतर ते पुण्याला जाणार आहेत. पुण्याला ३ वाजता १२०० पेक्षा जास्त प्रदेश कार्यकारणी सदस्य सोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर आमदार व खासदारांची बैठक होणार आहे. ज्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री यांच्याबरोबर त्यांची एक स्वतंत्र बैठक होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -