ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारच डोकं ठिकाणावर आहे का; भाजप आमदार राम कदम यांची टीका

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आता चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावला आहे. रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलीस विभागामध्ये पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात सुरू असणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे त्यांच्यावर सूड बुद्धीने ही कारवाई महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली.

मुंबई
author img

By

Published : Apr 27, 2021, 7:16 PM IST

मुंबई - मत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणात भारतीय प्रशासकीय सेवा (आयपीएस) अधिकारी रश्मी शुक्ला यांना आता चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावला आहे. रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलीस विभागामध्ये पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात सुरू असणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे त्यांच्यावर सूड बुद्धीने ही कारवाई महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली.

'एसआयडी'मध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले. उद्या म्हणजेच २८ एप्रिलला जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्यास शुक्लांना सांगण्यात आले आहे. सायबर सेलचे तपास पथक दिल्लीलाही गेले असल्याची माहिती माहिती आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.

या प्रकरणासंदर्भात भाजपचे आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. एखाद्या प्रकरणात अधिकारी भांडाफोड करण्याचे काम करत असेल आणि जर त्यांच्यावरच कारवाईचा बडगा सरकार उचलणार असेल तर या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आणि भ्रष्ट सरकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे पाप करत आहे, अशी टीका यावेळी आमदार राम कदम यांनी केली.

नेमकं प्रकरण काय आहे?

राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अहवाल लीक झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.