मुंबई: या प्रकरणात भाजप आमदार प्रसाद लाड त्यांच्याशी खास बातचीत केले आहे, आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. याबाबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत म्हणतात ही आमची संस्कृती नाही. दुसरीकडे यावर भाष्य करायचे. एकीकडे सांगायचे आमच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत आणि दुसरीकडे अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस व वहिनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका करायची. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासात अशी घरापर्यंत टीका-टिपण्णी कुणी केली नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वतः सांगायचे की कुणाच्या घरावर टीका करू नका. परंतु, तुम्ही त्या सर्व गोष्टींना बगल दिली आहे. आम्ही जर तुमच्या कुटुंबाबद्दल बोललो तर तुम्हाला चेहरा दाखवायला जागा राहणार नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची माफी मांगा, असे खडे बोल आमदार प्रसाद लाड यांनी सुनावले.
केंद्रीय तपास यंत्रणाचे काम छान, पण...: राज्य सरकार केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे, असे वारंवार आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पण कालच केंद्रीय तपास यंत्रणांचा अहवाल आला आहे. त्यात ३.२ टक्के राजकीय लोकांची नावे आहेत. यावरून समजते की, केंद्रीय तपास यंत्रणा फार छान काम करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा चुकीचे काम करत असेल तर त्यावर न्यायालय निर्णय घेऊ शकते, असेही प्रसाद लाड म्हणाले आहेत.
म्हणाले, हा सत्याचा विजय: शिंदे गटाला शिवसेनेचे अधिकृत नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 17 डिसेंबर, 2022 रोजी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. एकनाथ शिंदे यांचा झालेला विजय हा सत्याचा विजय आहे.
प्रसाद लाड यांना क्लिनचीट: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांना 2014 मध्ये बीएमसी करार फसवणूक केल्याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. ज्यात वादग्रस्त बिल्डर आणि व्यापारी बिमल अग्रवाल यांनी त्यांची करोडोंची फसवणूक केल्याचा दावा करून त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती.
काय होते प्रकरण: मुंबई महापालिकेच्या घाटकोपर विभागीय कार्यालयाने 2009 मध्ये प्रसाद लाड आणि अग्रवाल यांच्या कंपनीला 150 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. या कंत्राटातील आर्थिक अनियमिततेचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2014 मध्ये नोंदवला होता. मुंबई पोलिसांनी पुरावे उपलब्ध नसल्याची माहिती देणारा संक्षिप्त अहवाल दंडाधिकारी न्यायालयात सादर केला होता. यामुळे प्रसाद लाड यांना क्लिन चिट मिळाली होती.
हेही वाचा: TCS CEO Rajesh Gopinathan : कोण आहेत राजेश गोपीनाथन, ज्यांनी दिला टीसीएसच्या सीईओ पदाचा राजीनामा