ETV Bharat / state

Rahul Gandhi : 'राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी'

मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा(Rahul Gandhi Modi Surname Remark) दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोष सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका (Nitesh Rane) केली आहे. दिलासा जरी मिळाला असला तरी राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 4, 2023, 6:54 PM IST

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरएसएसवर आरोप केले होते. त्या आरोपांचा समाचार घेताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Modi Surname Remark) यांना दिलासा दिला आहे. तरीसुद्धा राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

ओबीसी समाजाचा अपमान केला - मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गाधीं यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, मी निकाल वाचला नाही. पण त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. म्हणून त्यांनी ओबीसी समजाची माफी मागावी. त्यातून पळवाट काढू नये.

आदित्य ठाकरेंना सल्ला - उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील परकीय गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढली आहे. त्याला ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावर आक्षेप घेत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी व्हाईट पेपर वाचला आहे का? आधी काय लिहिले आहे ते त्यांनी चश्मा काढून वाचावे आणि मग बोलावे, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला आहे.

देशद्रोही लोक आहेत - याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी संघावर आरोप केले आहेत. पण पुण्यात जेव्हा दहशतवादी सापडले तेव्हा संजय राऊत काहीच बोलले नाहीत. ना त्या विषयावर 'सामना'त अग्रलेख आला. सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपती करा, असा प्रस्ताव शिवसेनेतून आला होता. मग आता काय झाले? यावरून हे किती देशद्रोही लोक आहेत हे दिसून येते, असे नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा -

  1. Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन
  2. Rahul Gandhi : राहुल गांधींचा संसदेत 'कमबॅक', अविश्वास प्रस्तावावरील चर्चेतही होणार सहभागी
  3. SC Stay Conviction Rahul Gandhi : 'मोदी' प्रकरणी राहुल गांधींना 'सर्वोच्च' दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.