ETV Bharat / state

भाजपचे 'कुबेर'..! मंगलप्रभात लोढांच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

मुंबईमधील प्रसिद्ध बिल्डर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे भाजपचे कुबेर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या १० वर्षात मोठी वाढ झाली आहे. १० वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडणूक लढवताना लोढा यांनी आपली संपत्ती ६८ कोटींची दाखवली होती. त्यात अनेक पटीने वाढ झाली आहे..

मंगलप्रभात लोढांच्या संपत्तीत वाढ
author img

By

Published : Oct 2, 2019, 10:30 AM IST

Updated : Oct 2, 2019, 10:45 AM IST

मुंबई - मुंबईमधील प्रसिद्ध बिल्डर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे भाजपचे कुबेर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या १० वर्षात मोठी वाढ झाली आहे. १० वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडणूक लढवताना लोढा यांनी आपली संपत्ती ६८ कोटींची दाखवली होती. त्यात अनेक पटीने वाढ झाली असून, यावेळी अर्ज भरताना लोढा यांनी आपली संपत्ती जवळपास ५०० कोटींची दाखवली आहे. त्यात १५ कोटी रुपयांचे सोने चांदी असून १४ लाख रुपयांची एकच गाडी असल्याचे म्हटले आहे.

मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामधून आमदार म्हणून मंगलप्रभात लोढा निवडून आले आहेत. १० वर्षांपूर्वी २००९च्या विधानसभा निवडणुकीवेळी स्थावर ३४ आणि जंगम ३४ अशी ६८ कोटींची मालमत्ता आणि ७ कोटींचे कर्ज असल्याचे लोढा यांनी जाहीर केले होते. २०१४ च्या निवडणुकीत लोढा यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता २०० कोटी रुपयांची असल्याचे म्हटले होते. गेल्या ५ वर्षांत लोढांच्या संपतीमध्ये ३०० कोटींची भर पडली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी काल (मंगळवार) मलबार हिल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.

राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या नावावर १३१ कोटी ६६ लाखांची, पत्नीच्या नावावर ११० कोटी ७१ लाख तर एकत्र कुटुंबाच्या नावावर १० कोटी २२ लाख अशी २५२ कोटी ५९ लाख रुपयांची जंगम तर २२९ कोटी ३७ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जवळपास ५०० कोटींचे मालक असलेल्या लोढा यांनी आपल्याकडे एकच १४ लाखांची जग्वार गाडी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सोने चांदी किती ?
लोढा यांच्याकडे ४ हजार १७ ग्रॅम सोने, ७९ हजार ५५४ ग्रॅम चांदी आहे. त्याची किंमत ६ कोटी ५५ लाख ८९ हजार ८१२ रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे ७ हजार २५३ ग्रॅम सोने, ६५ हजार ५५४ ग्रॅम चांदी असून, त्याची किंमत ७ कोटी २२ लाख ३ हजार १३० रुपये इतकी आहे. तर दोघांच्या नावाने एकत्र २९ हजार ९३१ ग्रॅम चांदी असून त्याची किंमत १ कोटी २८ लाख ९६ हजार ६७४ रुपये इतकी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Intro:भाजपा मुंबई अध्यक्षांच्या संपत्तीत कित्तेक पटीने वाढ, 
५०० कोटींचे मालक, १५ कोटींची सोने चांदी, गाडी मात्र १४ लाखांची 

मुंबई - मुंबईमधील प्रसिद्ध बिल्डर व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीमध्ये गेल्या दहा वर्षात मोठी वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडणूक लढवताना लोढा यांनी आपली संपत्ती ६८ कोटींची दाखवली होती. त्यात अनेक पटीने वाढ झाली असून यावेळी अर्ज भरताना लोढा यांनी आपली संपत्ती जवळपास ५०० कोटींची दाखवली आहे. त्यात १५ कोटी रुपयांची सोने चांदी असून १४ लाख रुपयांचंजी एकच गाडी असल्याचे म्हटले आहे. Body:मुंबईच्या मलबार हिल मतदार संघामधून आमदार म्हणून मंगलप्रभात लोढा निवडणून आले आहेत. १० वर्षांपूर्वी २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्थावर ३४ आणि जंगम ३४ अशी ६८ कोटींची मालमत्ता आणि ७ कोटींचे कर्ज असल्याचे लोढा यांनी जाहीर केले होते. २०१४ च्या निवडणुकीत लोढा यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता २०० कोटी रुपयांची असल्याचे म्हटले होते. गेल्या पाच वर्षांत लोढांच्या मालमत्तेमध्ये ३०० कोटींची भर पडली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी काल मलबार हिल मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे. 

राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या नावावर १३१ कोटी ६६ लाखांची, पत्नीच्या नावावर ११० कोटी ७१ लाख तर एकत्र कुटुंबाच्या नावावर १० कोटी २२ लाख अशी २५२ कोटी ५९ लाख रुपयांची जंगम तर २२९ कोटी ३७ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जवळपास ५०० कोटींचे मालक असलेल्या लोढा यांनी आपलीकडे एकच १४ लाखांची जगुवार गाडी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

सोने चांदी किती ?
लोढा यांच्याकडे ४०१७ ग्राम सोने, ७९५५४ ग्राम चांदी आहे, त्याची किंमत ६ कोटी ५५ लाख ८९ हजार ८१२ रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे ७२५३ ग्राम सोने, ६५५५४ ग्राम चांदी असून त्याची किंमत ७ कोटी २२ लाख ३ हजार १३० रुपये इतकी आहे. तर दोघांच्या नावाने एकत्र २९९३१ ग्राम चांदी असून त्याची किंमत १ कोटी २८ लाख ९६ हजार ६७४ रुपये इतकी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.  

गुन्हे किती आणि कोणते ?
लोढा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे रेल्वे कायदा कलम १७४ (अ), १४७, आयपीसीच्या ४०६ व ४२० कलमाच्या ५ केसेस नोंद असल्याचे म्हटले आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे कोर्ट, ठाणे, पनवेल, दादर या ठिकाणी आंदोलन व फसवणूक केल्याच्या या केसेस असून त्यामध्ये त्यांना कुठलीही शिक्षा सुनावण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.Conclusion:
Last Updated : Oct 2, 2019, 10:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.