ETV Bharat / state

'भाजपाने राजस्थानमध्ये चांगला धडा घेतला' - छगन भुजबळ शरद पवार भेट मुंबई

भाजपातील काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या चर्चेच्या संदर्भात भुजबळ म्हणाले की, भाजपतील आमच्या संपर्कात असणारी लोकांची नाव आम्ही सांगणार नाही. त्यावर चर्चाही करणार नाही. मात्र, जर काही जण आमच्या पक्षात आले तर त्यांना राजीनामा देऊन यावे लागेल तसेच आमच्याकडे आले तर ते शंभर टक्के निवडून येऊ शकतात.

chhagan bhujbal
छगन भुजबळ
author img

By

Published : Aug 13, 2020, 2:45 PM IST

मुंबई - राजस्थानमध्ये भाजपाने काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी अनेक प्रकारचे हातखंडे वापरले. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे राजस्थानमधून भाजपाने चांगला धडा घेतला, असा टोला अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपाला टोला लगावला. राज्यात भाजपाकडून ऑपरेशन लोटस कमळ चालवले जाऊ शकते, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भाजपातील काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या चर्चेच्या संदर्भात भुजबळ म्हणाले की, भाजपतील आमच्या संपर्कात असणारी लोकांची नाव आम्ही सांगणार नाही. त्यावर चर्चाही करणार नाही. मात्र, जर काही जण आमच्या आले तर त्यांना राजीनामा देऊन यावे लागेल तसेच आमच्याकडे आले तर ते शंभर टक्के निवडून येऊ शकतात. आम्ही महाविकासा आघाडी म्हणून त्यांना निवडून आणू, असे भुजबळ म्हणाले. तरीही कोण येणार याची मला कल्पना नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री

शरद पवार-भुजबळ भेट

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज (गुरुवारी) छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राज्यात रेशन कार्डवर अन्नसुरक्षेच्या कक्षात येणाऱ्या साडेसात कोटी जनतेला येत्या काही दिवसात 5 महिन्यासाठी 1 किलो हरभरा (चना) डाळ मोफत दिली जाणार आहे. त्यासाठीचा निर्णय आम्ही घेतला आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी मी आता शरद पवार यांची भेट घेतली, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

त्यासोबतच कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या विषयावर शरद पवार यांनी कोणतेही विधान करण्यास टाळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.