ETV Bharat / state

आपण डोळ्यावर पट्टी बांधून किती दिवस एका कुटुंबाच्या पाठीमागे धावणार आहात - राम कदम - काँग्रेस नेते राहुल गांधी शरद पवार

आमचा सवाल काँग्रेसच्या नेत्यांना आहे, आपण डोळ्यावर पट्टी बांधून किती दिवस एका कुटुंबाच्या पाठीमागे धावणार आहात. देशाच्या विकासासाठी लोकांच्या कल्याणासाठी तुमच्या डोळ्यावरची पट्टी कधी उतरणार आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Dec 5, 2020, 5:32 PM IST

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्य नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत नुकतेच केले होते. यावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महाराष्ट्रात असलेल्या तीन पक्षांमध्ये वारंवार नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. यावरून भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

पप्पू कोण आहे? एका व्यक्तिविशेषचे नाव समोर येते

राम कदम यांनी महाविकास आघाडीच्या पक्षातील नाराजीवर बोलताना म्हटले की, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचा फार मोठा अनुभव आहे. शरद पवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या काँग्रेसबरोबर वाटाघाटी करून सरकार चालवत आहेत. काय विडंबना आहे ही?. बराक ओबामा यांनीदेखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. देशात असा प्रश्न उपस्थित केला गेला की पप्पू कोण आहे? तर एका व्यक्तिविशेषचे नाव समोर येते. आमचा सवाल काँग्रेसच्या नेत्यांना आहे, आपण डोळ्यावर पट्टी बांधून किती दिवस एका कुटुंबाच्या पाठीमागे धावणार आहात. देशाच्या विकासासाठी लोकांच्या कल्याणासाठी तुमच्या डोळ्यावरची पट्टी कधी उतरणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलेला आहे. त्यांनादेखील आमचा सवाल आहे की, तुमचे तीन पक्ष्यांचे भांडण कधी संपणार आहे. तुमच्या भांडणामुळे विकास ठप्प झालाय. तो कधी सुरू होणार? असे कदम यांनी म्हटले.

काँग्रेस नेतृत्व अतिशय स्थिर, निर्णयक्षम आहे - मंत्री यशोमती ठाकूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ठाकूर यांनी माध्यमावर व्यक्त होत म्हटले की, आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावे, असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असे मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.