ETV Bharat / state

ठाकरे सरकारने लॉकडाऊनविषयी घेतलेल्या भूमिकेचे दरेकर यांनी केलं स्वागत

राज्य सरकारने पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा मध्यम मार्ग काढलेला आहे. हा अतिशय उत्तम असा निर्णय आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

bjp leader pravin darekar on maharashtra government lockdown decision
ठाकरे सरकारने लॉकडाऊनविषयी घेतलेल्या भूमिकेचे दरेकर यांनी केलं स्वागत
author img

By

Published : Apr 5, 2021, 4:16 AM IST

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वीकेंडला शनिवार-रविवार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश आणि नियमावली सोमवारी सरकारकडून काढण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.

प्रविण दरेकर काय म्हणाले, राज्य सरकारने पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा मध्यम मार्ग काढलेला आहे. हा अतिशय उत्तम असा निर्णय आहे. लॉकडाऊन करू नये, अशी भावना केवळ भाजप, महाविकास आघाडी सरकारची नव्हती. तर सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन परवडणार नाही, अशा प्रकारची भूमिका सर्व पक्षीय लोकांची होती. दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि वीकेंडला लॉकडाऊन अशा प्रकारचा मध्यम मार्ग निश्चितपणे उत्तम आहे.

प्रविण दरेकर बोलताना

जनतेची काळजी आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये सक्षमपणा करण्याची आवश्यकता आहे. जे विसंवादाचे विषय आहेत, ज्यामुळे खालच्या स्तरावरील लोकांवर अन्याय होतो. त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. पूर्ण लॉकडाउन झाला असता तर, सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली असती. कोरोनाच्या काळात विरोधकांची भूमिका न घेता एकत्रित या विषयवार मत मांडलं पाहिजे, असे देखील दरेकर म्हणाले.

महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था कोलमडली असून, राज्य सरकार आरोग्य यंत्रणा वाढवली असल्याचे सांगत असले तरी कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता ऑक्सिजन बेडस, वेंटिलेटरची कमतरता आजही भासत आहे. वेळेत ऑक्सिजन बेडस, वेंटिलेटर मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण राज्यात वाढू लागले आहे. वस्तुस्थितीला सामोरे जात व्यवस्था सशक्त करण्याची आवश्यकता आहे. रुग्णांची परिस्थिती बघता १० हजार रुग्णांना पुरेल एवढी सुद्धा आरोग्य व्यवस्था उपलब्ध नाही. यामुळे सर्व गोष्टी गांभीर्याने घेत सर्व गोष्टी तात्काळ नियोजनात आणावी, असेही दरेकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.