ETV Bharat / state

... तर भंडाऱ्याच्या पंक्तीला बसण्याची व्यवस्था आम्ही करू - दरेकरांचे राऊतांना रोखठोक प्रत्युत्तर - दरेकर यांचे प्रत्युत्तर

संजय राऊत दोन्ही बाजुने आपले मत मांडत आहेत. एका बाजुने कालचा विषय संपला म्हणायचे आणि दुसऱ्या बाजुने शिवप्रसाद आणि शिवथाळी देण्याच्या गोष्टी करायच्या. शिवसेनेचे हिंदुत्व, देव, दैवत याविषयीची भुमिका पातळ होत आहेत. तुमच्या शिव थाळी पेक्षा आम्ही भंडाऱ्याची व्यवस्था करू म्हणजे थोड पुण्य आमच्या पदरी पडेल. आम्ही मुग गिळुन बसणाऱ्यामधले नाही असा टोलाही प्रविण दरेकर यांनी लगावला.

bjp leader praveen darekar on sanjay raut
दरेकरांचे राऊतांना रोखठोक प्रत्युत्तर
author img

By

Published : Jun 18, 2021, 8:20 AM IST

मुंबई - शिव प्रसादमध्ये शिवला अभिप्रेत असणारे काम आमच्या पक्षाकडून सुरु आहे, आणि प्रसाद पण आमच्याकडे आहे. शिवभोजनाची थाळी जेव्हा द्यायची तेव्हा द्या... पण आम्ही काय तोंडाला पट्टी लावून बसलो नाही. आम्ही जर भंडाऱ्याची व्यवस्था केली तर तुम्हालाही पंक्तीला बसावे लागेल, असे रोखठोक प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिले आहे. शिवसेना भवन येथील कालच्या राड्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता प्रसाद दिलाय, पुढे शिवभोजन थाळी देऊ, असे विधान केले होते, त्याला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आम्ही मुग गिळून बसणाऱ्यांमधले नाही -

संजय राऊत दोन्ही बाजुने आपले मत मांडत आहेत. एका बाजुने कालचा विषय संपला म्हणायचे आणि दुसऱ्या बाजुने शिवप्रसाद आणि शिवथाळी देण्याच्या गोष्टी करायच्या. शिवसेनेचे हिंदुत्व, देव, दैवत याविषयीची भुमिका पातळ होत आहेत. तुमच्या शिव थाळी पेक्षा आम्ही भंडाऱ्याची व्यवस्था करू म्हणजे थोड पुण्य आमच्या पदरी पडेल. आम्ही मुग गिळुन बसणाऱ्यामधले नाही असा टोलाही प्रविण दरेकर यांनी लगावला.

भोजन तर भंडाऱ्यात तुम्हाला जेवायचे आहे-

राऊत यांनी शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळी मध्ये वेळ वाया घालवु नये. वाझे जेल मध्ये असुन आता प्रदीप शर्मा देखील जेल मध्ये जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भत्याचा त्यांनी विचार करावा. शिवसेनेचे मंत्री वाझेंसाठी अधिवेशनात भांडत होते. मुख्यमंत्रीही त्याची बाजू घेत होते. वाझे काय लादेन आहे का? असे मुख्यमंत्री म्हणत होते. मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए काम करत आहे. सगळ्या संशयाच्या सुया एकाच दिशेने जात आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणात आधी लक्ष द्याला हवे, भोजन तर भंडाऱ्यात तुम्हाला जेवायचे आहे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.

हेही वाचा - शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका; संजय राऊतांचा भाजपाला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.