ETV Bharat / state

मुंबईच्या महापौरांची चौकशी करा, किरीट सोमैयांची पालिका आयुक्तांकडे मागणी

महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे चार गाळे बळकावले असून त्याचीही चौकशी करावी, अशीही मागणी केल्याची माहिती सोमैया यांनी दिली.

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या
author img

By

Published : Sep 17, 2020, 4:55 PM IST

Updated : Sep 17, 2020, 5:16 PM IST

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मुलाला पालिकेचे कंत्राट मिळवून दिले आहे. महापौरांच्या मुलाच्या नावे असलेल्या कंपनीच्या पत्त्यावर आणखी ८ कंपन्यांची नोंद असून त्या कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. तसेच महापौरांनी एसआरएची घरे लाटली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी दिली.

भाजप नेते किरीच सोमैया यांची प्रतिक्रिया

आज सोमैया यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या नावे 'किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी वरळीच्या गोमती जनता सोसायटी, जीके कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ या पत्त्यावर रजिस्टर आहे. याच पत्त्यावर ८ बोगस कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. त्या सगळ्याच कंपन्यांचे मालकी हक्क,आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केल्याचे सोमैया यांनी सांगितले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे चार गाळे बळकावले असून त्याचीही चौकशी करावी, अशीही मागणी केल्याची माहिती सोमैया यांनी दिली. महापौर या पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना पदाचा गैरवापर करत लाभ करून दिल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याचे सोमैया यांनी सांगितले.

हेही वाचा - 'मुंबईतील रेल्वे सेवा सुरू करा; अन्यथा, सविनय कायदेभंग करावा लागेल'

Last Updated : Sep 17, 2020, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.