ETV Bharat / state

'राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा'

५ ऑगस्टला राममंदिराची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता. पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनतेला व भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Aug 3, 2020, 4:32 PM IST

मुंबई : अयोध्या येथे रामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट रोजी होत आहे. आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज(सोमवार) राज्यातील जनतेला व भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ५ ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या येथे रामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता. पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा, असे ते म्हणाले. मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा, असे त्यांनी सांगितले.

मात्र, त्यादिवशी समारंभाचा सामुहिक उत्सव टाळावा. सामूहिक उत्सव साजरा करणार असाल तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. सामुहिक उत्सवामध्येसुद्धा कोरोनाचे भान ठेवावे. ढोलताशे आणि फटाके बिलकूल नकोत. तसेच गृहमंत्री अमित शाह हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीमुळे मनामध्ये खूप चिंता निर्माण झाली. ते लवकर बरे होवोत असेही पाटील म्हणाले. कोल्हापूरच्या अंबाबाईवर अमित शाह यांची श्रद्धा आहे. अमित शाह यांच्या तब्येतीला लवकर आराम मिळो व ते त्यांच्या कामाच्या नेहेमीच्या झपाट्याने पुन्हा कार्यरत होवोत, अशी आपण अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.