ETV Bharat / state

राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल - आशिष शेलार - Ashish Shelar

वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. या विषयावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ऊर्जामंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

BJP Leader Ashish Shelar Criticism on Government over Electricity Bill
राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल - आशिष शेलार
author img

By

Published : Nov 18, 2020, 2:35 PM IST

मुंबई - वीज बिलामध्ये सवलत मिळेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले होते. आता त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत, वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही, असे जाहीर केले. या विषयावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ऊर्जामंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आशिष शेलार बोलताना...
ऊर्जामंत्र्यांचा यू-टर्न
महाविकास आघाडी सरकारने वीज बिल सवलतीबाबत यू-टर्न घेतला आहे. कोरोना काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा करण्यात आली. परंतु आता वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल
शेलार म्हणाले की, 'सरासरी' विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली. तशीच बनवाबनवी 'सरासरी राज्य सरकारने' वीज ग्राहकांसोबत ही केली. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला. अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल, अशा शब्दात भाजपा नेते शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा - केंद्र सरकारनंतर आता खासगी बिल्डरचा कांजुरमार्गच्या जागेवर दावा

हेही वाचा - राज्यात २ हजार ८४० नवीन कोरोना रुग्णांची वाढ; रिकव्हरी रेट ९२.६४ टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.