मुंबई - शहरातील जोगेश्वरी ते वांद्रे भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे पाणी न आल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. यावर मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ, असे आश्वासन देणाऱ्यांनी तर 24 तास बार उघडे केले, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. या संदर्भात ट्विट करत त्यांनी सरकारला टोला लगावला.
-
मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी "फेंकम फाक" करणाऱ्यांनी 24×7 बार उघडे केले.गेले 3 दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ!ऐवढी वर्षे मुबईकरांसोबत अशी "ही बनवाबनवी" सुरु आहे. हे तर ठग्ज आँफ मुंबईकर! #JanJanKaBudget
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी "फेंकम फाक" करणाऱ्यांनी 24×7 बार उघडे केले.गेले 3 दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ!ऐवढी वर्षे मुबईकरांसोबत अशी "ही बनवाबनवी" सुरु आहे. हे तर ठग्ज आँफ मुंबईकर! #JanJanKaBudget
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 2, 2020मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी "फेंकम फाक" करणाऱ्यांनी 24×7 बार उघडे केले.गेले 3 दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ!ऐवढी वर्षे मुबईकरांसोबत अशी "ही बनवाबनवी" सुरु आहे. हे तर ठग्ज आँफ मुंबईकर! #JanJanKaBudget
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 2, 2020
काय म्हणाले आशिष शेलार ?
'मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी "फेंकम फाक" करणाऱ्यांनी 24×7 बार उघडे केले आहेत. आणि मुंबईकर मात्र, गेले 3 दिवस पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ! ऐवढी वर्षे मुबईकरांसोबत अशी "ही बनवाबनवी" सुरू आहे. हे तर ठग्ज आँफ मुंबईकर!' असे ट्विट शेलार यांनी केले आहे.
हेही वाचा - 'या घटना संशयास्पद, हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण?'
दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे एक महत्त्वाची पाईपलाईन फुटल्याने प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेले. परिणामी या विभागातील हजारो लोकांना वेठीला धरल्यासारखी परिस्थिती आहे. 24 तास पाणी देऊ केल्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने 24 तास बार खुले केले आहेत. मुंबईकर पाण्यावाचून तडफडत आहे. शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला. त्यावर बोलण्यापेक्षा मुंबईतील जनतेशी इतक्या वर्ष बनवाबनवी केली त्यावर बोला, अशी टीका करत शेलार यांनी सरकारला 'ठग्स ऑफ मुंबईकर' असे म्हटले आहे.