ETV Bharat / state

भाजपची दुसरी यादी जाहीर; राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, पुण्यात बापटांना संधी - latur

भाजपची दुसरी यादी जाहीर; राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, पुण्यात बापटांना संधी देण्यात आली आहे. तर बारामतीमध्ये राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना संधी देण्यात आली आहे.. यासारख्या इतर राजकीय घडामोडींचा वाचा आढावा ...

लोकसभा निवडणुकांचा आढावा, भाजपची दुसरी यादी जाहीर
author img

By

Published : Mar 23, 2019, 8:17 AM IST

Updated : Mar 23, 2019, 12:58 PM IST

जानकरांचे पंख छाटले; बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपकडून तिकीट

पुणे - बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी अखेर भाजपला उमेदवार सापडला आहे. भारतीय जनता पक्षाकडून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. कांचन कुल यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांच्या सहयोगी पक्ष रासपचे नेते महादेव जानकर यांचे पंख छाटले आहेत. त्यामुळे आता महादेव जानकर भाजपच्या या खेळीवर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गत निवडणुकीत बारामतीमधून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. वाचा सविस्तर

भाजपची दुसरी यादी जाहीर; राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, पुण्यात बापटांना संधी

मुंबई - लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यात चार विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आलेली आहेत. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरिश बापट यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर सोलापुरात बनसोडेच्या जागी जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दिंडोरीत भारती पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. बारामतीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल असा सामना होणार आहे. कुल या भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत.

भाजपच्या तरुण तुर्कांनी आडवाणींच्या राजकीय खेळींचे स्मरण ठेवावे - उद्धव ठाकरे

मुंबई - भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या १८२ उमेदवारांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना संधी देण्यात आलेली नाही. ते गांधीनगर मतदार संघातून खासदार होते. मात्र, या निवडणुकीत अडवाणीऐंवजी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आडवाणींना सक्तीची विश्रांती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपच्या तरुण तुर्कांनी आडवाणींच्या चमकदार राजकीय खेळीचे स्मरण ठेवायला हवे, असा टोला पक्षाचे मुखपत्र सामनामधून लगावला आहे. वाचा सविस्तर

काँग्रेसची सातवी यादी जाहीर; अशोक चव्हाण, संजय निरुपम यांची नावे गुलदस्त्यात

मुंबई - काँग्रेसने मध्यरात्री उशिरा लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात तामिळनाडू, ओरिसा, जम्मू- काश्मीर, छत्तीसगड आणि राज्यातील ५ अशा एकूण २२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसच्या उमेदवरांच्या या यादीत जालना लोकसभा मतदार संघातून विलास औताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर, औरंगाबादमधून सुभाष झांबड, भिवंडीतुन सुरेश टावरे आणि चंद्रपूरमधून विनायक बंगाडे यांना उमेदवारी दिली आहे.

लातूरात भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत लोकसभेच्या रिंगणात

लातूर - भाजपापाठोपाठ काँग्रेसनेही शुक्रवारी उशीरा लातूर लोकसभा मतदार संघाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्य लढत कुणामध्ये होणार ह स्पष्ट झाले असून काँग्रेसकडून मच्छिंद्र कामंत यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने शृंगारे विरुद्ध कामंत यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. लातूर या राखीव मतदार संघात कामत यांच्या रुपाने नवीन चेहरा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कामत राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले होते.

महाराष्ट्रातील ४० लाख दलित आणि मुस्लीम मतदार यादीतून गायब - कोळसे पाटील

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्यावत केली जात आहे. मात्र, दलित आणि मुस्लीम मतदार सत्ताधाऱ्यांना मते देत नसल्याने त्यांनी सुमारे ४० लाख मतदारांची नावे गाळल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, देशभरातून १२ कोटी तर राज्यातून ४० लाखांच्या वर मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आले आहे. यात मुस्लीम आणि दलित मतदारांची नावे गायब आहेत. त्यामुळे यामागे नक्कीच भारतीय जनता पक्ष आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

राज्यात सुमारे ४ हजाराने मतदान केंद्रे वाढली

मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदारांची नाव नोंदणी अद्यापही सुरू आहे. नाव नोंदणीची प्रक्रिया निवडणुकीआधीपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येतील. यामध्ये ग्रामीण भागात 55 हजार 814 तर शहरी भागात ३९ हजार ६५९ मतदान केंद्रे असतील, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाकडून तीन उमेदवार जाहीर

मुंबई - मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरविणार असून मुंबई आणि उपनगरीय परिसरातील तीन लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकविण्यासाठी आम्ही तीन ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला काँग्रेस देणार नवीन चेहरा

मुंबई - लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. नुकतीच भाजप-शिवसेनेने मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मुंबई मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २०१४ साली उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा दणदणीत पराभव केला होता. तसेच काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या जागेवर निरुपम यांनी दावा केला आहे. त्यामुळे उत्तर मुंबईत शेट्टी यांच्या विरोधात कोणाला उतरवायचे हा प्रश्न काँग्रेससमोर उभा होता.

मोदी सरकारचा लाखो कोटींचा घोटाळा कॅगने आणला समोर - जयंत पाटील

मुंबई - जानेवारी महिन्यात जाहीर झालेल्या 'कॅग'च्या अहवालामध्ये मोदी सरकारचा लाखो कोटी रूपयांचा घोटाळासमोर आला आहे. यावरून देशात नरेंद्र मोदी सरकारने किती आर्थिक गोंधळ घातलाय आणि आर्थिकेदृष्ट्या किती बेबनाव केलाय, याची खात्री आता देशातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

साताऱ्यातून नरेंद्र पाटलांना उमेदवारी ?

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले नरेंद्र पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. साताऱ्यातून शिवसेनेच्या तिकीटावर ते निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची पहिली यादी आज शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत पालघर व सातारा लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.

मला डावलून भारती पवारांना तिकीट मिळालं तर माझ्यावर अन्यायच - हरिश्चंद्र चव्हाण

नाशिक - दिंडोरी मतदारसंघाविषयी दिल्लीत कोणताही निर्णय झालेला नाही. माझ्या उमेदवारीचा विचार दिल्लीतील केंद्रीय मंत्री करतील. मला डावलून भारती पवार यांना तिकीट मिळालं तर माझ्यावर हा अन्यायच आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा करण्यात आलेली नसल्याचे वक्तव्य हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले.

Intro:Body:

राज्यात सुमारे 4 हजाराने मतदान केंद्रे वाढली

मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदारांची नाव नोंदणी अद्यापही सुरू आहे. नाव नोंदणीची प्रक्रिया निवडणुकीआधीपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.  यंदाच्या निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येतील. यामध्ये ग्रामीण भागात 55 हजार 814 तर शहरी भागात 39 हजार 659 मतदान केंद्रे असतील, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाकडून तीन उमेदवार जाहीर

मुंबई - मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरविणार असून मुंबई आणि उपनगरीय परिसरातील तीन लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकविण्यासाठी आम्ही तीन ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला काँग्रेस देणार नवीन चेहरा

मुंबई - लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. नुकतीच भाजप-शिवसेनेने मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मुंबई मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २०१४ साली उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा दणदणीत पराभव केला होता. तसेच काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या जागेवर निरुपम यांनी दावा केला आहे. त्यामुळे उत्तर मुंबईत शेट्टी यांच्या विरोधात कोणाला उतरवायचे हा प्रश्न काँग्रेससमोर उभा होता.

मोदी सरकारचा लाखो कोटींचा घोटाळा कॅगने आणला समोर - जयंत पाटील

मुंबई - जानेवारी महिन्यात जाहीर झालेल्या 'कॅग'च्या अहवालामध्ये मोदी सरकारचा लाखो कोटी रूपयांचा घोटाळासमोर आला आहे. यावरून देशात नरेंद्र मोदी सरकारने किती आर्थिक गोंधळ घातलाय आणि आर्थिकेदृष्ट्या किती बेबनाव केलाय, याची खात्री आता देशातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

साताऱ्यातून नरेंद्र पाटलांना उमेदवारी ?

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले नरेंद्र पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. साताऱ्यातून शिवसेनेच्या तिकीटावर ते निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची पहिली यादी आज शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत पालघर व सातारा लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.

मला डावलून भारती पवारांना तिकीट मिळालं तर माझ्यावर अन्यायच - हरिश्चंद्र चव्हाण

नाशिक - दिंडोरी मतदारसंघाविषयी दिल्लीत कोणताही निर्णय झालेला नाही. माझ्या उमेदवारीचा विचार दिल्लीतील केंद्रीय मंत्री करतील. मला डावलून भारती पवार यांना तिकीट मिळालं तर माझ्यावर हा अन्यायच आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा करण्यात आलेली नसल्याचे वक्तव्य हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Mar 23, 2019, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.