ETV Bharat / state

Rajeshree Shirwadkar on Kishori Pednekar : महापौर ठेकेदाराच्या कुरणावर जगणाऱ्या हत्ती; भाजपा नगरसेविकेची महापौरांवर अप्रत्यक्ष टीका - राजश्री शिरवाडकर महापौर किशोरी पेडणेकर टीका

राणीबागेतील पेंग्विनच्या पिलाला इंग्रजी नाव देण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. ( Politics on Penguine in Rani Garden Mumbai ) भाजपाकडून केलेल्या आरोपाला महापौरांनी हत्तीचे नाव चंपा तर माकडाचे नाव चिवा ठेवू, असे प्रत्युत्तर दिले. याला भाजपाकडून पुन्हा प्रत्युत्तर देण्यात आले असून महापौर ठेकेदाराच्या कुरणावर जगणाऱ्या हत्ती असल्याची टीका करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) आणि भाजपा यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Rajeshree Shirwadkar on Kishori Pednekar
राजश्री शिरवाडकर आणि किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 21, 2022, 3:15 PM IST

Updated : Jan 21, 2022, 3:28 PM IST

मुंबई - राणीबागेतील पेंग्विनच्या पिलाला इंग्रजी नाव देण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. ( Politics on Penguine in Rani Garden Mumbai ) भाजपाकडून केलेल्या आरोपाला महापौरांनी हत्तीचे नाव चंपा तर माकडाचे नाव चिवा ठेवू, असे प्रत्युत्तर दिले. याला भाजपाकडून पुन्हा प्रत्युत्तर देण्यात आले असून महापौर ठेकेदाराच्या कुरणावर जगणाऱ्या हत्ती असल्याची टीका करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) आणि भाजपा यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चंपा आणि चिवा नाव ठेवू -

मुंबईच्या राणीबागेत पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ऑस्कर तर वाघाच्या बछडीचे नाव वीरा ठेवण्यात आले आहे. पेंग्विनच्या पिलाचे नाव इंग्रजी ठेवल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजप टीका करतंय ना मराठी नावं ठेवायला हवी तर मग पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेऊ. हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि एक माकडाचं पिल्लु पण येणार आहे त्याचं चिवा ठेऊ असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा, असा सल्लाही महापौरांनी भाजपा आणि चित्रा वाघ यांना दिला आहे.

ऑस्कर पुरस्कार चालतो -

भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनीही पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ऑस्कर ठेवल्यावरून टीका केली आहे. याबाबत बोलताना राजश्री शिरवडकर बद्दल बोलणार नाही. बोलण्या एवढ्या त्या मोठ्या नाहीत. ऑस्कर पुरस्कार चालतो मग ते नाव का नाही. यांच्या टीकेला आता कधीच उत्तर देणार नाही. असे महापौरांनी म्हटले होते.

हेही वाचा - List of Popular CMs : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये उद्धव ठाकरेंनी पटकावलं स्थान

महापौरांवर अप्रत्यक्ष टीका -

त्यानंतर आज राजश्री शिरवाडकर यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यात एक हत्ती दाखवला असून ट्विटमध्ये ओळखा पाहू कोण ??? असे लिहिले आहे. तसेच फोटोमधील हत्तीवर राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते, ठेकेदाराच्या कुरणावर चरते, कुरण न दिल्यास डिवते आणि आख्खी फाईलच गिळते असे लिहिण्यात आले आहे. महापौरांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे महापौरांवर टीका केली आहे.

काय लिहले आहे ट्विटमधील फोटोमध्ये -

राणीच्या बागेत नांदते
हत्तीसारखी डुलते
ठेकेदाराच्या कुरणावर चरते
कुरण न दिल्यास डिवते
आणि आख्खी फाईलच गिळते

Bjp Corporator Rajeshree Shirwadkar Criticized Mumbai Mayor Kishori Pednekar
ट्विटचा फोटो

Last Updated : Jan 21, 2022, 3:28 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.