मुंबई- तत्कालीन भाजप सरकार होते त्यावेळी त्यांनी मुंबईतील 500 चौरस फुट जागेवरील घरांना टॅक्स लागणार नाही, अशी घोषणा केली होती. याबाबत ठरावाला विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली होती. त्याबाबत जीआर देखील निघाला होता. मात्र, केवळ जनरल टॅक्स माफ झाला. भाजपने नागरिकांना भ्रमित केले आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.
हेही वाचा - इंस्टाग्राम वापरकर्त्यांनो सावधान..! हॅकर्स करताहेत कॉपीराईट फिशिंग
मुंबईकरांची फसवणूक झाली
जीआरमध्ये 9 पैकी केवळ एक जनरल टॅक्स माफ झाला होता. हा जीआर गेल्या वर्षी मार्च आणि जुलैमध्ये निघाल्याने तो पूर्ण लागू करावा. मुंबईकरांचा पूर्ण टॅक्स माफ करावा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली.
मुंबईतील सर्व झोपडीधारकांना मोफत पाणी पुरवठा करावा
मुंबईतील सर्व झोपडीधारकांना मोफत पाणी पुरवठा करावा. दर महिन्याला झोपडपट्टी धारकांचे पाणी बिल 500 कोटी इतके येते. टॅक्स माफ केल्यास महापालिकेच्या तिजोरीवर केवळ 162 कोटींचा बोजा पडेल. मात्र, त्यामुळे लाखो गरिबांना फायदा होईल, अशी मागणी देखील जगताप यांनी केली.
पाच वर्षाचे आरक्षण न ठेवता दहा वर्षाचे करा
जनगणना अधिनियमानुसार महापालिका वॉर्डात जी व्यक्ती ज्या प्रवर्गातून निवडून येते, ती पाच वर्षे राहते. ती पुढे असेल असे नाही, त्यामूळे पूर्वी असलेले दहा वर्षाचे आरक्षण ठेवावे. यामुळे त्या व्यक्तीला आपल्या वॉर्डात नीट लक्ष देता येईल.
हेही वाचा - अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीचे समन्स