मुंबई- सायन रुग्णालयातील मृतदेह आदलाबदल प्रकरण, तसेच रुग्णालयात चालत असलेल्या गैर व्यवहाराप्रकरणी भाजपने आक्रामक पावित्रा घेतला आहे. आज भाजप तर्फे सायन रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच रुग्णालयातील गैरप्रकार थांबवा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनस्थळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, स्थानिक आमदार कॅप्टन सेलम, आमदार कालिदास कोळंबकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. तसेच, जोपर्यंत रुग्णालय अधिष्ठाताचे निलंबन होत नाही आणि रुग्णालयातील इतर गैरव्यवहारांवर बंदी घालण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता.